“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट

“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट

‘छावा’ चित्रपटाच्या क्रेझबद्दल काही वेगळं सांगायला नको. सर्वांच्याच ओठांवर आणि मनावर फक्त ‘छावा’चंच नाव आहे. चित्रपटाचं, कलाकारांचं सर्वांकडूनच कौतुक होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहून आवर्जून कमेंटही केल्या आहेत.

शरद पोंक्षेंच्या व्हिडीओवर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया

विकी कौशलने या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या आणि अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, संतोष जुवेकर सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, निलकांती पाटेकर, आस्ताद काळे असे मराठी कलाकार ही ‘छावा’मध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता छावामधल्याच एका अभिनेत्याची कमेंट व्हायरल होत आहे. तेही शरद पोंक्षेंच्या व्हिडीओवर.

शुभंकर एकबोटेने केलेली कमेंट चर्चेत 

‘छावा’ पाहिल्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी एक व्हिडीओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली होती. त्या व्हिडीओवर ‘छावा’मध्ये धनाजी हे पात्र साकारणाऱ्या शुभंकर एकबोटे या मराठी कलाकाराने कमेंट केली आहे. शुभंकर एकबोटेने केलेली कमेंट सध्या चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

शरद पोंक्षे काय म्हणाले होते?

शरद पोंक्षे यांनी ‘छावा’ चित्रपट पाहिला आणि त्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत त्यांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं होतं. तसेच या चित्रपटात झळकलेल्या सर्व मराठी कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या वठवल्या आहेत, असंही ते म्हणाले होते. तसेच “हा चित्रपट पाहून रक्त खवळतं आणि डोळ्यातील अश्रू थांबत नाहीयेत. आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंनी इतक्या वेदना सहन केल्या आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला. लक्ष्मण उतेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा चित्रपट शूट केला आहे, की त्यांचं कौतुक करायला हवं. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे.” असं बरंच काही म्हणत त्यांनी व्हिडीओमध्ये आपलं मत मांडलं होतं.

शुभंकरने केलेली कमेंट

शरद पोंक्षे यांनी केलेल्या या व्हिडीओवर शुभंकरने कमेंट करत म्हटलं की, “खूप खूप धन्यवाद काका…या चित्रपटाचा एक भाग होण्याची, छत्रपती संभाजी महाराजांच्या या महापराक्रमी शौर्यगाथेचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. All credit goes to Laxman Utekar Sir & Entire Team Chhaava…जय भवानी,” अशी कमेंट शुभंकरने शरद पोंक्षे यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. चित्रपटाने 7 दिवसांत भारतात 220 कोटींहून जास्त कमाई केली आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली? 500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली?
अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल...
सिनेमा मराठीत का बनवला नाही? स्क्रिप्ट चांगली नाही; ‘छावा’ सिनेमावर मराठमोळ्या अभिनेत्रीची टीका
‘छावा’ सिनेमाला यश, विकी कौशल पोहोचला 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात, असं केल्यानं पूर्ण होतात सर्व मनोकामना
‘तो बॅटिंग करत नव्हता तरीही…’, धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट
नगर अर्बनच्या घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट कसे? मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलली पाहिजेत
अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण हटाव सुरूच राहणार! दोन हजारांचा दंड करणार
वाईतील दोघांनीच दिली मुंबईतील चोरट्यांना टीप,सराफ बाजारातील चोरीचे गुढ उकलले; चौघांना अटक