मोठी बातमी! ‘तुझे तुकडे तुकडे करू तूला…’, भाजप नेत्याला धमकीचं पत्र
मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता भाजप आमदाराला धमकीचं पत्र आलं आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले या भाजपच्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. या पत्रानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली होती, हे प्रकरण ताजे असतानाच आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीच पत्र मिळाले आहे. ‘तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती,’ असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महालेंनी सांगितले आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणात आमदार महाले दुपारी आपल्या कार्यकर्त्यांह पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देणार आहेत .
श्वेता महाले यांची प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना महाले यांनी म्हटलं की. मी या प्रकरणात तक्रार दाखल करणार आहे. पोलिसांनी अशा लोकांन समोर आणून त्यांचा बुरखा फाडावा . दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते असा या पत्रातील मजकूर आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाज कंठकांचा बुरखा फाटला पाहिजे. त्यांच्यांविरोधा कडक कारवाई झाली पाहिजे. धमकी देणाऱ्या लोकांविरोधात सरकारने पाऊल उचललं पाहिजे.
मागच्या काळात माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे झाली. काँग्रेसच्या काळात एवढी विकास कामे कधी झालीच नाहीत. आम्ही कधी जाती भेद केला नाही, निवडणुकीत काँग्रेसने धर्माचे राजकारण केले . त्याचा राग ठेऊन हे धमकीचं पत्र मला आलं आहे. मौलवी सांगतात तसे डोक्यात ठेवल्या जाते. मला माझ्या मतदारसंघात सुरक्षेची काही गरज नाही, असं श्वेता महाले यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात आता त्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List