रक्ताने लिहिलेलं पत्र, 1000 कॉल्स; ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या चाहत्याने चक्क तिची बिकिनी विकत घेतली
बॉलिवूड कलाकारांचे करोडोने चाहते असतात. प्रत्येकजण आपल्या आवडत्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी अक्षरश: काहीह करायला तयार होतात. चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात याचा अंदाज लावणं कठीण आहे. अनेक कलाकारांना त्यांच्या चाहत्यांचे असे अनेक विचित्र अनुभव आले आहेत. असचा एक चाहता आहे ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
अभिनेत्रीच्या प्रेमात चाहता अखंड बुडालेला
एका अभिनेत्रीच्या प्रेमात हा चाहता एवढा वेडा आहे की चक्क त्याने या अभिनेत्रीची बिकीनी विकत घेतली. होय, हे थोडं विचित्र वाटत असलं तरी शेवटी चाहते कधी काय करतील याचा नेम नाही. हा चाहता ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे ती अभिनेत्री म्हणजे पूजा बेदी. 90 च्या दशकातील ही अशी अभिनेत्री जिच्या बोल्डनेसने चाहते घायाळ व्हायचे. त्या काळात तिची बोल्ड सीन्स आणि फोटोंसाठी लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली होती.
अनेक बोल्ड सीन्स अन्….
1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विष कन्या’ या चित्रपटातून पूजाने बॉलिवूड पदार्पण केलं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पूजा चर्चेचा विषय बनली. याचे कारण म्हणजे तिने या चित्रपटात दिलेले अनेक बोल्ड सीन्स. जरी तिने खूप कमी चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी तिचा फॅन फॉलोइंग खूप जास्त होती. हा चाहताही त्यांच्यातील एक. जो या अभिनेत्रीवर वेड्यासारखं प्रेम करायचा. त्यावे तिच्यावरील प्रेमासाठी बऱ्याच काही विचित्र गोष्टी केल्या होत्या.
रक्ताने लिहिलेलं पत्र ते बदललेलं नाव
पूजाने स्वत: हा किस्सा सांगिला आहे. पूजा एका कपिल शर्मा शोमध्ये आली होती तेव्हा तिने हे किस्से सांगितले. कपिलने तिला तिच्या चाहत्यांबद्दलच्या अनुभवावर प्रश्न विचारला. यावर तिने सांगितले की, “एक व्यक्ती होता ज्याने स्वतःचे नाव अनैस-अनैस ठेवले होते कारण त्यावेळी ते पूजाचे आवडते परफ्यूम ते होते. त्याला माझा लँडलाइन नंबर कुठून मिळाला हे माहित नाही, तो मला दिवसातून हजारो फोन करायचा, इतकेच नाही तर त्याने त्याच्या रक्ताने लिहिलेलं पत्रही पाठवायचा.” असं म्हणतं पूजाने ते प्रसंग सांगितले. तसेच या चाहत्याच्या या विचित्रपणामुळे पूजाने वैतागून पोलीस तक्रारही केली होती.
चाहत्याने विकत घेतली अभिनेत्रीची बिकिनी
त्याच चाहत्याशी संबंधित अजून एक किस्सा पूजाने सांगितला होता. ती म्हणाली की,” एकदा माझ्या लुटेरा येथील बिकिनीचा लिलाव होत होता, जो त्याने खरेदी केला होता. त्याने म्हटले होते की जर मी तिला मिठी मारू शकत नसेन तर किमान माझ्याकडे तिची बिकिनी तरी आहे.”, पूजाने सांगितले की तो एकदा हातात ती बिकिनी घेऊन तिच्या घरी आला होता. तेव्हा तिने त्या चाहत्याला खूप प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला होता. एवढंच नाही तर तो चाहता पूजाचं लग्न होईपर्यंत त्याने तिचा पिछा काही सोडला नसल्याचं पूजाने सांगितलं.
बरेचसे चित्रपट फ्लॉप
दरम्यान पूजाने अनेक वर्षे डेट केल्यानंतर 1994 मध्ये फरहान फर्निचरवालाशी लग्न केलं, परंतु 2003मध्ये व्हॅलेंटाईन डेलाच ते वेगळे झाले. पूजाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं तर तिने 8 चित्रपटांमध्ये काम केले होते, जे सर्व फ्लॉप ठरले. आमिर खानसोबत ‘जो जीता वही सिकंदर’ मध्येही तिने काम केले होते. तो चित्रपट मात्र त्यावेळी तुफान चालला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List