रणवीर अलाहाबादीया दिलगिरी व्यक्त करताना म्हणाला, ‘माझ्या आईच्या क्लीनिकमध्ये पेशंट बनून…’
कॉमेडियन समय रैना याच्या शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ देशात सध्या वादग्रस्त ठरला आहे. ब्लॅक कॉमेडी शोमध्ये आपल्या पालकांच्या लैगिंक जीवनाविषयी जोक करुन वादात सापडलेला युट्युबर रणवीर अलाहाबादीय़ा याच्या अडचणीत वाढच होत चालली आहे. रणवीर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहून देशभरात गुन्हे दाखल होत आहेत. संसदेत या प्रकरणात चर्चा घडली.सामान्य नागरिक आणि राजकारणी, सेलिब्रिटीपासून ते हिंदू संस्कृतीरक्षक संघटनांनी अक्षरश: रणवीरवर टीकेचा भडिमार सुरु केला आहे. याप्रकरणात सर्वात आधी आसामच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल केला त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आता तर अनेक राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
कॉमेडियन समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ प्रकरणात रणवीर अलाहाबादिया वर केसेस दाखल झाल्या असताना तो समन्स देऊनही हजर झालेला नाही. रणवीर यांचे सहकारी समय रैना, युट्युबर आशीष चंचलानी आणि इंफ्लुएंसर अपूर्वा मखीजा सह सर्व टीमवर केस दाखल झाली आहे. सर्वांना आळीपाळीने मुंबईतील खार पोलिस स्थानकात बोलावून चौकशी सुरु झाली आहे.
अद्यापर्यंत रणवीर अलाहाबादिया याचा जबाब घेतलेला नसून त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. रणवीर याच्या मुंबईतील घराला टाळा लागला आहे. तर अलाहाबादिया याचा फोन स्विच ऑफ लागत आहे. एवढच काय तर त्याच्या वकीलाशी देखील बोलणे झालेले नसल्याचे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रणवीर अलाहाबादिया याची पोस्ट
रणवीर भारतात नसल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. यात आता युट्युबर रणवीर अलाहाबादिया याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. इंस्टाग्रामवर त्याने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की माझी टीम आणि मी पोलिस आणि अन्य तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत. मी सर्व कायदेशीर प्रक्रीयेचे पालन करणार आहे. सर्व एजन्सींना मी सामोरे जाण्यास तयार आहे. पालकांच्या संदर्भातील माझे वक्तव्य असंवेदनशील आणि अनादर करणारे होते. चांगलं वागणं माझी नैतिक जबाबदारी आहे. मला खरोखरच दु:ख आणि पश्चाताप आहे.
मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे, त्यामुळे मी घाबरलो आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला आणि कुटुंबाला धमकावले जात आहे. लोक पेशंट बनण्याचा बहाणा करुन माझ्या आईच्या क्लीनिकमध्ये घुसले होते. मला भीती वाटते आणि मला कळत नाही काय करावे. परंतू तरीही मी पळणारा नाही. माझा पोलिस आणि भारतीय न्याय प्रणालीवर विश्वास आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List