‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर दहशत, पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाई, आकडा थक्क करणारा
Chhaava Box Office Collection Day 1: अभिनेता विकी कौशल स्टारर ऐतिहासिक ‘छावा’ सिनेमा 2025 वर्षातील बहुप्रतीक्षीत सिनेमा आहे. 14 फेब्रुवारी रोजी सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांना तुफान गर्दी केली. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगने देखील सर्व रेकॉर्ड मोडले. सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘छावा’ सिनेमाचं कौतुक फक्त विश्लेषकच नाही तर, नेटकरी देखील सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सिनेमाचं कौतुक होत आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी विकीने प्रचंड मेहनत घेतली आहे.
एवढंच नाही तर, पहिल्याच दिवशी सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ‘छावा’ सिनेमाने 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘छावा’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 31 कोटींची कमाई केली आहे. हे प्राथमिक आकडे असले तरी अधिकृत डेटा आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात.
‘छावा’ ने 2025 साली प्रदर्शित झालेल्या सर्व दक्षिण ते बॉलीवूड सिनेमांच्या ओपनिंग डे कलेक्शनचा विक्रम मोडला आहे आणि वर्षातील सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला आहे. या वर्षी दक्षिण आणि बॉलीवूडसह आठ सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. त्या सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर..
‘छावा’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली. ‘विदामुयार्ची’ सिनेमाने पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली. ‘स्काय फोर्स’ सिनेमाने पहिल्या दिवशी 15.30 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली. पण आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर, बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाची दहशत पाहायला मिळत आहे.
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत आशुतोष राणा आणि डायना पेंटी यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमा बनवण्यात आला आहे. आता येत्या दिवसांमध्ये सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल पाहणं महत्त्लाचं ठरणार आहे. शनिवार आणि रविवार असल्याचा फायदा सिनेमाला होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List