माघी यात्रेत पंढरपूरातील श्री विठ्ठल चरणी 3 कोटींचे दान; मोठ्या संख्येत भाविकांनी घेतले दर्शन

माघी यात्रेत पंढरपूरातील श्री विठ्ठल चरणी 3 कोटींचे दान; मोठ्या संख्येत भाविकांनी घेतले दर्शन

पंढरपूरात माघी यात्रा कालावधीत भक्तांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान दिले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण केले आहे. मंदीर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पुजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून 3 कोटी 3 लाखांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

माघी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. माघ शुध्द 1 (दिनांक 30 जानेवारी) ते माघ शुध्द 15 (दिनांक 12 फेब्रुवारी) या कालावधीत भाविकांनी श्रीचरणी 32,33,420 रुपये अर्पण केले आहेत. तर 80,34,128 रुपयांची देणगी मिळाली आहे. तसेच 40,81,000 रुपये लाडू प्रसाद विक्रीतून आले आहेत. तर 36,83,969 रुपये भक्तनिवास , 8,88,800 पुजेच्या माध्यमातून, 86,48,152 रुपये हुंडीपेटी, 10,39,707 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 6,97,640 रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 32,47,774 रुपये अर्पण , 89,02,798 रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून 39,44,000, भक्तनिवास 50,90,721 रुपये, 7,28,600 रुपये पुजेच्या माध्यमातून, 1,15,98,739 रुपये हुंडीपेटीतून, 5,15,805 रुपयाचे सोने-चांदीचे दागिणे अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 9,94,082 रुपये प्राप्त झाले होते.

2024 च्या माघी यात्रेत 3,50,22,519 रुपये व या वर्षीच्या यात्रेत 3,03,06,816 रुपये इतके उत्पन्न प्राप्त असून मागील यात्रेच्या तुलनेत 47,15,703 रुपये इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सुमारे 4 लाख 50 हजार लाडूप्रसादाची विक्री झाली असून, सुमारे 52 ग्रॅम सोने व 6 किलो चांदीच्या वस्तू प्राप्त झाल्या आहेत. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असेही यावेळी श्रोत्री यांनी सांगीतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ  एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ 
अभिनेत्री तथा युट्यूबर प्राजक्ता कोळी 13 वर्षांच्या रिलेशनला अखेर लग्नबंधनात अडकवलं आहे. प्राजक्ताने प्रियकर वृषांक खनालसोबत 25 फेब्रुवारी रोजी लग्न...
सलीम खान पासून शंकर कसे झाले सलमान खान याचे वडील, नावात कोणी आणि का केले बदल?
‘छावा’च्या नावावर आणखी एक विक्रम, आता काय घडलं? थेट…
मन्नतमध्ये काही बदल करण्याआधी शाहरूखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी; आहे खास कारण
Govinda – Sunita Ahuja : कोई माई का लाल…घटस्फोटाच्या चर्चानंतर सुनीता अहुजाची पहिली प्रतिक्रिया
मोदी, मिंध्यांकडून पोलीस भरतीचे गाजर; आश्वासने नकोत, वेळापत्रक तयार करा; उमेदवारांची मागणी
तानाजी यांनी सर केला 1800 फूट कोकणकडा