34 किमीचे मायलेज, 7 लाखांपेक्षा कमी किंमत, दैनंदिन वापरासाठी बेस्ट आहेत ‘या’ सर्वात CNG कार

34 किमीचे मायलेज, 7 लाखांपेक्षा कमी किंमत, दैनंदिन वापरासाठी बेस्ट आहेत ‘या’ सर्वात CNG कार

देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे, असं असलं तरी अजूनही CNG कार्सला देशात मोठी मागणी आहे. यातच जे लोक दररोज 50 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर प्रवास करतात त्यांच्यासाठी सीएनजी कार हाच एकमेव पर्याय शिल्लक आहे. सध्या हिंदुस्थानात सीएनजी कारचे अनेक पर्याय आहेत. बजेट सेगमेंटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंत तुम्ही तुमच्या गरजेनुसार कार निवडू शकता. जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्ही दैनंदिन वापरासाठी किफायतशीर सीएनजी कार घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट कार्सबद्दल माहिती देणार आहोत.

Tata Tiago CNG

Tata Tiago CNG हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कारमध्ये 1.2 लीटर इंजिन आहे, जे CNG मोडमध्ये 73hp पॉवर आणि 95Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे. ही कार 27km/kg मायलेज देते. कारची किंमत 5.65 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Celerio CNG

मारुती सेलेरियो सीएनजी ही एक जबरदस्त कार आहे. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार सीएनजी मोडवर 34.43 किमी/किलो मायलेज देते. या कारमध्ये 5 लोक सहज बसू शकतात.  सुरक्षेसाठी या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा आहे. Celerio CNG ची एक्स-शो रूम किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Wagon-R CNG

या कारमध्ये 5 लोक अगदी आरामात बसू शकतात. Wagon-R मध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे आणि ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे. याचे मायलेज 34 किमी/किलो आहे. सुरक्षिततेसाठी कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्ज आहेत. वॅगन-आर दैनंदिन वापरासाठी बेस्ट कार आहे. Wagon R ची किंमत 6.54 लाख रुपयांपासून सुरू होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ  एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ 
अभिनेत्री तथा युट्यूबर प्राजक्ता कोळी 13 वर्षांच्या रिलेशनला अखेर लग्नबंधनात अडकवलं आहे. प्राजक्ताने प्रियकर वृषांक खनालसोबत 25 फेब्रुवारी रोजी लग्न...
सलीम खान पासून शंकर कसे झाले सलमान खान याचे वडील, नावात कोणी आणि का केले बदल?
‘छावा’च्या नावावर आणखी एक विक्रम, आता काय घडलं? थेट…
मन्नतमध्ये काही बदल करण्याआधी शाहरूखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी; आहे खास कारण
Govinda – Sunita Ahuja : कोई माई का लाल…घटस्फोटाच्या चर्चानंतर सुनीता अहुजाची पहिली प्रतिक्रिया
मोदी, मिंध्यांकडून पोलीस भरतीचे गाजर; आश्वासने नकोत, वेळापत्रक तयार करा; उमेदवारांची मागणी
तानाजी यांनी सर केला 1800 फूट कोकणकडा