‘समाजातील सर्वात वाईट लोकं’; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता समय रैना अन् रणवीर भडकला
युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमधील वाद अजून वाढतच चालला आहे. समय आणि रणवीरवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांना पोलीश चौकशीसाठीही बोलवण्यात आले आहेत. सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आता अजून एका बॉलिवूड अभिनेत्याने त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्याचा रणवीरवर संताप
या शोमध्ये रणवीरने पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे हा वाद पेटला. रणवीरने त्याबद्दल सर्वांची माफीही मागितली मात्र त्यानंतरही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून एका अभिनेत्याने रणवीरला चांगलंच सुनावलं आहे. हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे, फक्त सॉरी म्हणून हे चालणार नाही. असं म्हणत या अभिनेत्याने रणवीरला फटकारलं आहे.
“घाणेरडेपणाचे स्वातंत्र्य….”
शेखर सुमन यांनी या कलाकारांवर टीका केली आहे. टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना त्यांनी म्हटंलं आहे की, “हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे, घाणेरडेपणाचे स्वातंत्र्य आहे, यामागील लोकांना सावध केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली पाहिजे. फक्त सॉरी म्हणून तुम्ही सुटू शकत नाही.”
“हे समाजातील सर्वात वाईट लोक आहेत”
शेखर सुमन पुढे म्हणाले, “हे समाजातील सर्वात वाईट लोक आहेत, जे आपल्या देशाच्या नैतिक रचनेचा नाश करत आहेत. त्यांना वाटते की ते खूप छान आहेत, पण ते काहीसे विकृत आणि बुद्धिहीन मूर्खांसारखेच आहेत. जर तुम्ही त्याला शो म्हणत असाल तर ते ताबडतोब बॅन केलं पाहिजे” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान हे प्रकरण वाढू लागल्याने समय रैनाने त्याच्या या शोचे सर्व एपिसोड म्हणजे सर्व व्हिडीओ हे डिलीट करून टाकले आहे. याचा अर्थ हा शो एकप्रकारे बंद केल्यासारखंच आहे.
गुवाहाटीमध्येही समय रैनाविरुद्ध गुन्हा दाखल
दरम्यान गुवाहाटीमध्येही समय रैनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आसाम पोलिसही कारवाई करण्याच्या मार्गावर आहेत. समय रैनाचे घर पुण्यातील बालेवाडी येथे आहे. अशा परिस्थितीत, आसाम पोलीस पुण्यातील त्याच्या घरी जाण्याची शक्यता आहे. त्याच्या घरी नोटीस लावण्यात येऊन त्याला चार दिवसांत हजर राहण्यास सांगितलं जाईल असंही म्हटलं जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List