घराबाहेर झोपायला गेला अन् परत आलाच नाही; तरुणाला जाळून मारले; बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावातील घटना
तरुणाला जाळून मारल्याची घटना बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आकाश बबनराव जाधव (22, रा. मेहुणा, ता. बदनापूर, जि. जालना) असे मयताचे नाव आहे.
आकाश नेहमी प्रमाणे 8 फेब्रुवारी रोजी रात्री घराबाहेर झोपण्यासाठी गेला होता. सकाळी त्याचे वडील बबनराव जाधव हे त्याला उठवण्यासाठी गेले असता तो त्याच्या मिळून आला नाही. म्हणून आकाशचे वडील यांच्यासह आजूबाजूच्या लोकांनी आकाशचा परिसरात शोध घेतला असता तो 500 मीटर अंतरावर असलेल्या शेततळ्यात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. आकाशचा घातपात कोणी आणि कशासाठी केला हे अद्याप समजून आलेले नसून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेतील आरोपीस शोधून त्याला जेरबंद करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आकाश जाधव याच्या नातेवाईकांनी केली. आकाश जाधव याचा मृतदेह जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह बदनापूर येथील पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List