मुंबई पालिका, मुंबई बंदरची सलामी

मुंबई पालिका, मुंबई बंदरची सलामी

आपल्या अद्वितीय आयोजनामुळे नेहमीच कबड्डीपटूंच्या आवडीचे मंडळ असलेल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतिचषक कबड्डी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कबड्डीचा थरार अनुभवायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात मुंबई बंदर, मुंबई महानगरपालिका, न्यू इंडिया अॅश्युरन्स आणि त्रिमूर्ती एंटरप्रायझेस या चारही संघांनी शेवटच्या मिनिटाला विजयाची सलामी देत पहिल्या दिवसाला रोमहर्षक केले.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कबड्डीप्रेमींना कबड्डीचा दमदार आणि जोरदार खेळ पाहाण्याचे भाग्य लाभले. मुंबई महानगरपालिकेने ठाणे महानगरपालिकेविरुद्धची लढाई 10-18 अशा पिछाडीनंतरही जिंकली. मनीष जाधव आणि अल्केश चव्हाणच्या कल्पक खेळामुळे मुंबई पालिकेला ठाणे पालिकेवर 35-34 अशी अवघ्या एका गुणाने मात करता आली. मुंबई बंदरने रिझर्व्ह बँकेविरुद्धचा संघर्ष 39-37 असा शेवटच्या चढाईवरच जिंकली. रूपेश साळुंखेच्या चढायांनी हा थरारक विजय मिळवून दिला. त्रिमूर्ती एंटरप्रायझेसने ज्ञानेश्वर शेळके, प्रशांत पवारच्या चढायांची बळावर युनियन बँकेविरुद्ध 28-27 असा विजय नोंदविला. युनियन बँकेच्या ओमकार गाडे आणि आदित्य शिंदे यांनी संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत झुंज दिली, पण त्यांना आपला पराभव टाळता आला नाही. न्यू इंडिया अॅश्युरन्सनेही रूपाली ज्वेलर्सविरुद्धचा थरारक सामना शेवटच्या क्षणाला जिंकला. मध्यंतराला 12-13 अवघ्या एका गुणाने ते पिछाडीवर होते. मात्र मध्यंतरानंतर सुसाट खेळ करत त्यांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. हा सामना न्यू न्यू इंडिया अॅश्युरन्सने 29-26 असा जिंकला.

स्वामी समर्थच्या या दिमाखदार स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अनिल देसाई आणि स्पर्धेचे आयोजक आणि आमदार महेश सावंत, शाखाप्रमुख संजय भगत यांच्या उपस्थितीत पार पडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पीओपी मूर्तींवर पूर्णत: बंदीच्या निर्णयाने मूर्तीकार नाराज, ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा पीओपी मूर्तींवर पूर्णत: बंदीच्या निर्णयाने मूर्तीकार नाराज, ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा
मुंबई महानगरपालिकेने आगामी गणेशोत्सवासाठी पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हा निर्णय घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या...
महत्त्वाची कामे नकोच… सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद, पर्याय काय?
IND vs PAK: भारताच्या विजयानंतर अनुष्काकडून पती विराट कोहलीवर प्रेमाचा वर्षाव, पहा पोस्ट
लग्न, घटस्फोट, कुटुंबावर कंगनाचं लक्षवेधी वक्तव्य, नाव न घेता कोणावर साधला निशाणा
हे चित्रपटात का दाखवलं नाही? ‘छावा’मधील डिलिट केलेल्या सीनवर प्रतिक्रियांचा वर्षाव
‘छावा’ सिनेमाला रविवारी बसला मोठा फटका, बॉक्स ऑफिसवर का मंदावला सिनेमाच्या कमाईचा वेग?
फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे व अजित पवार गटाला मतदान केलंय – सुरेश धस