Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं; सरकारचा मोठा निर्णय, तुमचंही नाव आहे का? लगेच चेक करा

Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांना लाडकी बहीण  योजनेतून वगळलं; सरकारचा मोठा निर्णय, तुमचंही नाव आहे का? लगेच चेक करा

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं सरकारनं लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती. आतापर्यंत एकूण सात हाप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र ज्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निर्दशनास आलं होतं. त्यानंतर आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या आदिती तटकरे? 

‘दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.

अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – २,३०,०००
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – १,१०,०००
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
एकुण अपात्र महिला – ५,००,०००

सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

 

2100 रुपये कधी मिळणार? 

दरम्यान आमचं सरकार आलं तर आम्ही  या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लांगलं आहे. दरम्यान येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना या योजनेंतर्गत 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारीचा हाप्ता देखील लवकरच जमा होऊ शकतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

1 एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष
शैक्षणिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच (2025-26) करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. याकरिता सर्व शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांनी...
भाजपकडून मिंध्यांना आणखी एक धक्का; पंढरपुरातील दर्शन मंडप, स्कायवॉकच्या 129 कोटींच्या कामाची प्रक्रिया थांबविली
माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा? संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची टोलेबाजी
कोस्टल रोडला महिनाभरातच तडे, महापालिकेची तात्पुरती मलमपट्टी, व्हायरल व्हिडिओने पितळ उघडे
पंतप्रधान मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन, मराठी भाषेत भक्ती, शक्ती आणि युक्ती!
अदानी वैयक्तिक नाही, तर देशातील भ्रष्टाचाराचे प्रकरण – राहुल गांधी
दहावीचा पहिलाच पेपर फुटला, कॉपीमुक्त घोषणेचा कचरा; जालन्यातील परीक्षा केंद्रावर अभूतपूर्व गोंधळ, पालकांकडून दगडफेक