Breaking news – धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, करुणा मुंडे यांनी जिंकला लढा
अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. करुणा मुंडे यांनी केलेल्या तक्रारीवरून वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाने करुणा मुंडे यांनी केलेले आरोप मान्य केले आहेत. एवढेच नाही तर धनंजय मुंडे यांनी दरमहा 1 लाख 25 हजार रुपयांची पोटगी करुणा मुंडे यांना द्यावी असे आदेशही दिले आहेत.
घरगुती हिंसाचार प्रकरणी करुणा मुंडे यांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत करुणा मुंडे यांना देखभाल खर्च द्यावा, कुठल्याही प्रकारची दुखापत करू नये आणि 1 लाख 25 हजार रुपयांचा मासिक खर्च द्यावा असे निर्देश दिले आहेत. तसेच मुलगी शिवानी हिला लग्न होईपर्यंत महिना 75 हजार रुपये द्यावेत असेही निर्देश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यास करुणा मुंडे यांनीही माध्यमांशी बोलताना दुजोरा दिला.
करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी
करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च… pic.twitter.com/URrKRw6B7V
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 6, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List