सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडन हिचे ट्वीट, म्हणाली, हे तर आता….

सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडन हिचे ट्वीट, म्हणाली, हे तर आता….

सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या निवासस्थानी अज्ञाताने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आता बॉलीवूडच्या अनेक ताऱ्यांनी संतप्त प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यात नेहमी अनेक घटनांवर आपली सडेतोड भूमिका मांडणाऱ्या एकेकाळची मस्त मस्त गर्ल रवीना टंडन हीने देखील आपला स्टँड मांडला आहे. रवीना टंडन यांनी एक्समाध्यमावर आपली जळजळीत प्रतिक्रीया दिली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात सैफ अली खान याच्या घरी त्याच्यावर चाकू हल्ल्याची बातमी ऐकून मी शॉक्ड आहे. सैफ यातून लवकर बरा होवो अशी आपण प्रार्थना करीत असल्याचे रवीना टंडन हीने म्हटले आहे. रवीनाने वांद्र्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करीत सुरक्षा उपाय वाढविण्याची मागणी केली आहे.

गुरुवारी मध्यरात्री सैफ अली खानवर झालेल्या जीवघेणा हल्ला झाल्यानंतर बॉलीवूडमधून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत. अनेक फिल्मी हस्तीनी या प्रकरणात आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अभिनेत्री रवीना टंडन हीने मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीतील प्रसिध्द व्यक्तींवर होत असलेल्या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. या परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध व्यक्ती अशा गुन्हेगारांच्या सहज शिकार होत आहेत, हे रोजचे झाले आहे असे रवीना हीने एक्स प्लॅटफॉर्मवर ट्वीट करीत म्हटले आहे.

येथे पोस्ट पाहा –

अराजक तत्वे वाढली

सुरक्षित निवासस्थानाची परिसर असलेल्या वांद्रे येथे प्रसिद्ध व्यक्तींना लक्ष्य केले जात आहे. त्यांना सहज टार्गेट केले जात आहे. त्यामुळे अराजक तत्वांची वाढ झाली आहे.रवीना पुढे लिहीतात की एक्सीडेंट स्कॅम, हॉकर माफिया, अतिक्रमण करणारे, भूखंड माफीया, बाईकवरुन हुल्लडबाजी करणारे क्रिमिनल्स, फोन, आणि चेन स्नॅचिंग करणे सहज होत आहे. कठोर नियमांची गरज आहे. सैफ याची प्रकृती लवकरात लवकरी व्हावी अशी प्रार्थना करते असेही या ट्वीटमध्ये रवीना टंडन हीने लिहीले आहे.

जूनमध्ये मुंबईत रवीनाच्या चालकांवर हल्ला

गेल्या वर्षी जून महिन्यात रवीना आणि त्यांचा ड्रायव्हरवर जमावाने हल्ला केला होता. ड्रायव्हरवर हलगर्जीने वाहन चालविण्याचा आरोप लावण्यात आला होता. हा हल्ला पूर्वनियोजित होता असा आरोप त्यानंतर न्यूजएक्सला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत अभिनेत्री रवीना टंडन हीने केला होता.

सैफच्या घरात चाकूहल्ला

अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून अज्ञाताने त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या हल्लेखोराने अभिनेता सैफ याच्यावर ६ वेळा चाकूने वार केला. ज्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी हा हल्ला चोरीच्या उद्देश्याने झाल्याचे सांगितले जात आहे. पहाटे अडीचच्या सुमारास सैफ त्याच्या कुटुंबासह घरात झोपला असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आरोपीचा चेहरा सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत असे म्हटले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना? मोठी बातमी! ‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत; यादीत तुमचं तर नाव नाहीना?
ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या...
नशिबवान पिढीच्या नशिबात महाकुंभमेळा! 144 वर्षांनी योग, देव-दानवांच्या युद्धावेळी….
लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत, 11 जणांना घेतला चावा
सख्या तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा केला खून
चोराने सैफच्या घरातील ‘या’ व्यक्तीला ओलीस धरलं? मध्यरात्री घरात घडला थरार; नवा खुलासा धक्कादायक
सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री रवीना टंडन हिचे ट्वीट, म्हणाली, हे तर आता….
‘सैफ यांच्या लहान मुलाकडे जात होता हल्लेखोर तेव्हाच…’, रात्री 2 वाजता घरात काय घडले, पोलिसांना केअरटेकरने सांगितली संपूर्ण घटना