लाजच आणली… भर गर्दीत नको त्या अवस्थेत शिरताच महिला प्रवासी किंचाळल्या; मुंबई लोकलमधला धक्कादायक प्रकार

लाजच आणली… भर गर्दीत नको त्या अवस्थेत शिरताच महिला प्रवासी किंचाळल्या; मुंबई लोकलमधला धक्कादायक प्रकार

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेतून लाखो प्रवासी दररोज प्रवास करतात. यात पुरुषांसह महिलांची संख्याही मोठी असते. सकाळी धावपळ करत ऑफिसला जाणे आणि त्यानंतर पुन्हा तीच ठरलेली लोकल पकडणे हा महिलांचा दिनक्रम कायमच ठरलेला असतो. मात्र काल मुंबईतील लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मध्य रेल्वेच्या एसी ट्रेनमध्ये चक्क एक व्यक्ती नग्न अवस्थेत चढल्याने महिलांचा गोंधळ उडाला. या घटनेचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.

नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेची संध्याकाळी 4.11 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज ते कल्याणच्या दिशेने जाणारी एसी लोकल असते. या एसी लोकलने अनेक कर्मचारी प्रवास करतात. मात्र या एसी लोकलमध्ये अचानक एक व्यक्ती नग्न अवस्थेत चढला. यानंतर एसी लोकलमध्ये असलेल्या महिलांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तर काहींनी या घडलेल्या घटनेचे व्हिडीओ काढले.

अवघ्या काही क्षणात हे व्हिडीओ व्हायरल झाले. छत्रपती शिवाजी महाराज ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये चढलेला तो व्यक्ती नेमका कोण  होता, याची माहिती अज्ञाप समोर आलेली नाही. मात्र तो मनोरुग्ण असावा असा अंदाज वर्तवली जात आहे.

टीसीने काढले बाहेर

एसी लोकलमध्ये अनेक महिलांनी गोंधळ घालण्यात सुरुवात केली. महिलांच्या या गोंधळामुळे एसी लोकलमधील तिकीट निरीक्षक त्या ठिकाणी पोहोचला. त्याने त्या नग्न अवस्थेतमध्ये असलेल्या व्यक्तीला धक्के मारत ट्रेनच्या बाहेर काढले. यानंतर  तिथे उपस्थितीत असलेल्या महिलांसह प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

दरम्यान या अत्यंत खळबळजनक घटनेनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एसी लोकलसाठी नेहमीपेक्षा कितीतरी अधिक पैसे खर्च करून तिकीट अथवा पास विकत घेतला जातो. एखाद्या एसी लोकलमध्येच जर असा प्रकार घडत असेल तर एवढे पैसे मोजण्याचा काय उपयोग? ढीगभर पैसे खर्च करूनही जर महिलांना शांतपणे, सुरक्षितपणे प्रवास करता येत नसेल तर सामान्य लोकालमधील महिलांची काय कथा वर्णावी? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. या एकंदर प्रकारामुळे महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आता जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात उद्या शरद पवार आणि छगन भूजबळ एकाच मंचावर, नाराज भूजबळांच्या भुमिकेकडे लक्ष पुण्यात उद्या शरद पवार आणि छगन भूजबळ एकाच मंचावर, नाराज भूजबळांच्या भुमिकेकडे लक्ष
उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहेत....
बीएसएफ बांगलादेशातील दहशतवाद्यांना बंगालमध्ये घुसू देत आहेत, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय कधी? विखे पाटलांचं मोठं वक्तव्य
दोन अफेअर,10 वर्ष रिलेशनशिप; तरीही 53 वर्षीय तब्बू सिंगलच का राहिली? कारण विचारताच अभिनेत्रीनं घेतलं तिसऱ्याचं अभिनेत्याचं नाव
सतत चिडचिड होतेय, रडू येतय, मूड नाहीये? ‘हे’पदार्थ नक्की खा, लगेचच व्हाल एकदम फ्रेश
मराठीचा आग्रह धरला म्हणून तरुणाला मागावी लागली माफी, मुंब्र्यातली धक्कादायक घटना
खासगी बसेस खरेदी स्थगितीची अधिकृत सूचना सरकारने काढावी, अंबादास दानवेंची मागणी