मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा; मंत्रिमंडळ विस्तारानंतर दुसऱ्याच दिवशी केली मोठी घोषणा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा दिला होता. तसेच मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचे म्हटले होते. आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्याचा दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतची घोषणा त्यांनी सोमवारी केली आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाला, आता उद्या पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषणाची तारीख सांगणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नाही. आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी एकटाच बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. मी जर उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरांमधून मराठे उपोषणाला बसतील, आमची ताकद आम्ही दाखवून देऊ, अशा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. सरकार या आधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्की सोडवेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List