अद्ययावत रुग्णालय देतो सांगून ‘ऊर्जा’ नावाच्या दवाखान्यावर बोळवण! जिंदाल कंपनीने फसवले
<<<दुर्गेश आखाडे>>>
जयगडमध्ये जिंदाल कंपनी सुरू झाली तेव्हा ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध कमी करण्यासाठी जिंदाल कंपनीने अनेक आश्वासने दिली. स्थानिकांना रोजगारापासून रुग्णालयापर्यंत दिलेली आश्वासने हवेत विरली आहे. अद्यायावत रूग्णालय सोडा कंपनीने जो दवाखाना उभारलाय तिथेही आरोग्य सुविधा नाहीत. वायुगळतीची घटना घडली तेव्हा विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थांनी रत्नागिरी गाठली. जिंदाल कंपनीने अद्ययावत रुग्णालय देतो सांगून ऊर्जा नावाच्या दवाखान्यावर बोळवण करून ग्रामस्थांची फसवणूक केली.
गुरूवारी जिंदाल कंपनीत एलपीजी वायुगळती होऊन 68 विद्यार्थी आणि एका महिलेची प्रकृती बिघडली. या विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. काहींना चक्कर आली. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यासाठी जिंदाल कंपनी पुढे आली नाही. विद्यार्थ्यांना रूग्णालयात नेण्यासाठी वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली नाही. या दुर्घटनेनंतर चौकशीसाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात आली असून कंपनीच्या चार अधिकाऱ्यांवर जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऊर्जा दवाखान्याचा उपयोग काय? हे वायुगळतीने उघडकीस आणले
कंपनी स्थापन झाल्यापासून स्वतःचे उत्पादन वाढवताना जिंदाल कंपनीला ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. जिंदाल कंपनीत किती स्थानिकांना रोजगार मिळाला हा संशोधनाचा विषय आहे. जिंदाल कंपनी अद्ययावत रूग्णालय उभं करणार होती. हे रुग्णालय कागदावरच राहिले. जिंदालने ऊर्जा नावाने दवाखाना उभारलाय तिथे आवश्यक आरोग्य सुविधा नाहीत.त्यामुळे दुर्घटना घडल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामस्थांनी रत्नागिरी गाठली. जिंदाल कंपनीने अद्ययावत रुग्णालय देतो सांगून ऊर्जा नावाच्या दवाखान्यावर बोळवण करून ग्रामस्थांची फसवणूक केली. दुर्घटना घडल्यानंतर ऊर्जा दवाखान्याचा उपयोग काय? हे वायुगळती प्रकरणाने उघडकीस आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List