अर्भक फेकणाऱ्या महिलेला अटक, नागपाडा पोलिसांची कारवाई
मृत अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी महिलेला नागपाडा पोलिसांनी अटक केली. मिस कॅरेज झाल्याने तिने मृत अर्भक टाकून पळ काढल्याचे तपासात समोर आले आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या महिन्यात नागपाडा येथे पोलिसांचे पथक गस्त करत होते. तेव्हा महिला पोलीस शिपाई गायकवाड यांना भायखळा जेल समोरील फुटपाथवर एक बेवारस अर्भक दिसून आले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या अर्भकाला ताब्यात घेऊन जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अर्भकाला मृत घोषित केले. घडल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अज्ञात महिले विरोधात गुन्हा नोंद केला.
तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये महिला अर्भकाला टाकून जात असल्याचे दिसले. तोच धागा पकडून पोलिसांनी तपास पुढे नेला. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली. चौकशीत तिने ते अर्भक तिचे असल्याचे पोलिसांना सांगितले. ती महिला पती आणि कुटुंबीयांसोबत नागपाडा परिसरात राहते. तिचे मिस कॅरेज झाले होते. तिने ती माहिती लपवून अर्भकाची विल्हेवाट लावून पळ काढल्याचे तपासात समोर आले आहे. नागपाडा पोलिसांनी तिला अटक केली. तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List