Border Gavaskar Trophy – ट्रॅव्हिस हेड आणि स्मिथ ठरले ऑस्ट्रेलियासाठी तारणहार; बुमराचा पंजा मात्र टीम इंडिया बॅकफूटवर

Border Gavaskar Trophy – ट्रॅव्हिस हेड आणि स्मिथ ठरले ऑस्ट्रेलियासाठी तारणहार; बुमराचा पंजा मात्र टीम इंडिया बॅकफूटवर

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या गॅबा कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली असून 7 गड्यांच्या मोबदल्यात 405 धावांचा टप्पा पार करत 500 धावांचा डोंगर रचण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतके ठोकत टीम इंडियाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दिवसा अखेर एलेक्स कॅरी 45 आमि मिचेल स्टार्क 7 धावांवर नाबाद मैदानामध्ये टिकून आहेत.

नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पहिला दिवस वरुण राजाने गाजवल्यामुळे फक्त 13.2 षटकांचा खेळ होऊ शकला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 28 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा धार पहायला मिळाली. त्याने उस्मान ख्वाजा (21 धावा), नॅथन मॅकस्विनी (9 धावा) यांना झटपट बाद केले, तसचे नितीश रेड्डी याने लॅबुशेन याला 12 या धावसंख्येवर बाद करत तिसरा धक्का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 75 अशी झाली होती. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपले जाळे पसरवण्यास सुरुवात केली होती. परंतु स्टीव्ह स्मिथ आणि टीम इंडियासाठी नेहमची डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेड यांनी गोलंदाजांचे जाळे भेदत धमाकेदार फलंदाजी केली.

दोघांनीही सयंमी खेळी करत संघाचा डाव सावरला आणि गोलंदाजांवर तुटून पडले. स्मिथने 190 चेंडूंचा सामना करत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. तसेच ट्रॅव्हिस हेडने 160 चेंडूंचा सामना करत 18 चौकारांच्या मदतीने 152 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 75 धावांवर घसरलेली गाडी थेट 300 पार झाली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 241 धावांची भक्कम भागी करत संघाचा डाव सावरला. परंतु पुन्हा एकदा बुमरा टीम इंडियासाठी धावून आला आणि त्याने ऑस्ट्रेलियाला लागोपाठ तिन मोठे हादरे दिले. बुमराने प्रथम आपल्या जाळ्यात स्मिथ, त्यानंतर मिचेल मार्श (5 धावा) आणि स्मिथ यांना परफेक्ट अडकवले. बुमराने ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबुत धाडला. त्यानंतर कर्णधार कमिंन्सला सिराजने 20 धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रिलियाला सातवा हादरा दिला. त्यामुळे दिवसा अखेर अॅलेक्स कॅरी (45 धावा) आणि मिचेल स्टार्क 7 धावांवर नाबाद खेळत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले शाहरुख खानचा लंडनमधील बंगला म्हणजे आलिशान महालच; फोटो व्हायरल,चाहते मात्र संतापले
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानबद्दल काही वेगळं सांगायला नको. शाहरूख खान म्हणजे लाखो नाही तरी करोडो दिल की धडकन आहे....
शरीराच्या ‘या’ भागावर होतो परिणाम… बसल्या बसल्या पाय हलवता? लगेच सोडून द्या सवय
कोल्ड ड्रिंक आणि प्रोटीन शेक एकत्र प्यायल्यामुळे काय होते? जाणून घ्या दुष्परिणाम
हिवाळ्यामध्ये आलू बुखारा खाण्याचे जबरदस्त फायदे… ऐकुन व्हाल थक्क
ब्राउन शुगर किंवा मध? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर
नातं टिकवा, नातं मजबूत करा… 2025 मधील महत्त्वाच्या टिप्स काय?
सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या; संतोष देशमुख हत्याप्रकरणावर अंजली दमानिया यांचा टोला