भिंतीवरी ‘कालनिर्णय’ असावे… सात भाषांमध्ये दिनदर्शिका प्रकाशित
एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले सुमंगल प्रकाशनचे ‘कालनिर्णय’ मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तामिळ आणि तेलग अशा सात भाषांमध्ये प्रकाशित झाले. मागील 50 वर्षांहून अधिक काळ ‘कालनिर्णय’ने मराठी माणसावरच नव्हे, तर हिंदुस्थानी मनावर आपला सांस्कृतिक ठसा उमटवला आहे.
पंचांग, भविष्य, सणवार, तिथी-नक्षत्रे, शास्त्रार्थ ही ‘कालनिर्णय’ची प्रमुख अंगे असून पंचांग जनसामान्यांसाठी सोपे व सुलभ करण्याचा सांस्कृतिक ‘रिफॉर्म’ कालनिर्णयने पन्नास वर्षांपूवीच केला. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून छोटे कालनिर्णय, श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, नोटपॅड, स्वादिष्ट, आरोग्य, मोठे ऑफिस (मराठी, इंग्रजी), छोटे ऑफिस (मराठी, इंग्रजी), अॅकॉर्डियन, मिनी, मायक्रो, वर्षचंद्रिका, मंथली प्लॅनर, पॉकेट डायरी, एटीएम कार्ड होल्डर, इयर प्लॅनर व नोंदणी अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित केल्या. यंदा ‘कालनिर्णय’ने मॅग्नेट, स्लीम विकली नोट प्लॅनर तसेच मोठे ऑफिस हिंदी व गुजराती या खास आवृत्त्याही आणल्या आहेत. देशातील पहिली वेबसाईट, अॅप अशा उपक्रमांद्वारे ‘कालनिर्णय’ काळाबरोबर चालत आहे.
जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन हा बहुमान ‘कालनिर्णय’ला ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयुक्त प्रकाशने वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहेत व भविष्यातही असाच प्रयत्न राहील, असे संपादक, प्रकाशन जयराज साळगावकर यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List