जयगड येथील जिंदाल कंपनीत वायुगळती; 60 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये एलपीजी वायुगळती झाली. वायुगळतीमुळे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील 60 विद्यार्थांची प्रकृती बिघडली. अनेक विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. काहीना चक्कर आली तर काही विद्यार्थ्यांना उलटी झाली. या सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास जिंदाल पंपनीत वायुगळती झाली. एलपीजी गॅसची वायुगळती झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. जिंदाल कंपनीपासून जवळ असलेल्या माध्यमिक विद्यामंदिर जयगडमधील विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. काही विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास झाला,काही विद्यार्थी चक्कर येऊन पडले. काही विद्यार्थ्यांनी उलटय़ा केल्या. चार ते पाच विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. काही विद्यार्थ्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी ज्या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
जयगडच्या सरपंच फरझाना डांगे यांनी कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला. घटना घडल्यानंतर आम्ही पहिल्यांदा विद्यार्थ्यांकडे धाव घेतली आहे. उद्या आम्ही ग्रामस्थ कंपनीत जाऊन जाब विचारणार आहेत.
…तर जिंदाल कंपनीचा माज उतरवू
झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुर्घटना घडल्यानंतर जिंदाल कंपनीने शाळेतील शिक्षकांबरोबर हुज्जत घालत आपला या घटनेशी संबंध नसल्याचे सांगून हात वर केले. परंतु माणुसकीच्या नात्याने कंपनीने अत्यवस्थ विद्यार्थ्यांना हॉस्पीटलला नेण्यासाठी गाडया पाठवल्या असत्या परंतु पंपनीने खालच्या पातळीचे कृत्य केले आहे. त्यांना जर एवढा माज आला असेल तर तो उतरवला जाईल.
प्रसाद सावंत,
शहर संघटक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List