नुसतं दूध पिऊ नका त्यामध्ये या गोष्टीचा करा समावेश, आजारपण येणारच नाही

नुसतं दूध पिऊ नका त्यामध्ये या गोष्टीचा करा समावेश, आजारपण येणारच नाही

दूध हे आपल्या शरिरासाठी खूप आवश्यक आहे. ते आपल्या हाडे तर मजबूत करतातच पण इतर आरोग्याचे देखील फायदे होता. दूध किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत आहे. पण त्याच्यासोबत आणखी काय मिक्स केल्याने फायदे होऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. रात्री अनेक जण एक ग्लास दूध पिऊन झोपतात. बहुतेक लोकं नुसतं साधे दूध पितात. पण तुम्ही जर त्यात काही मसाले टाकले तर त्याचा आरोग्याला दुप्पट फायदा होऊ शकतो. दुधात फक्त तुम्हाला तुळस आणि काळी मिरी टाकायची आहे. याचा फायदे काय होणार आहेत ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दुधात प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, रिबोफ्लेविन (बी2), नियासिन (बी3), पॅन्टोथेनिक ॲसिड (बी5) आणि कोबालामिन (बी12), आयोडीन, पोटॅशियम, सेलेनियम आणि जस्त आढळतात. पण त्यात काळी मिरी जर मिसळली तर काय होते.

काळी मिरीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6, थायमिन, नियासिन, सोडियम, पोटॅशियम सारखे गुणधर्म असतात. तुळशीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच ल्युटीन, झेक्सॅन्थिन, बीटा-कॅरोटीन आणि बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन यांसारखे अँटीऑक्सिडंट असतात. आता हे एकत्र करुन दूध प्यायल्याने काय फायदे होतात जाणून घेऊयात.

चांगली झोप येते

जर तुम्ही दुधात काळी मिरी टाकली तर ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शियमचे शोषण वाढवते, ज्यामुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी ते जरूर प्यावे.

पचन निरोगी राहते

दुधात जर तुम्ही काळी मिरी मिसळली आणि दूधाचे सेवन केले तर तुमची पचनक्रिया सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो.

सर्दी-खोकल्यापासून आराम

तुळस आणि काळी मिरी यांचे मिश्रण करुन दुध पिल्याने सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी होतात. तसेच श्वसन प्रणाली स्वच्छ ठेवते. ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे त्यांनी हे दूध जरूर प्यावे.

मानसिक तणाव दूर करतो

तुळस आणि दुधाचे मिश्रण मानसिक ताण कमी करतो. यामुळे शांत झोप घेण्यास मदत होते. त्याचबरोबर तुळशीतील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे तुम्हाला ऋतुमानानुसार लागणाऱ्या आजारांपासून दूर राहता येते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 व्होटर स्लीप वाटण्यावरून भाजपच्या गुंडांचा धुडगूस  व्होटर स्लीप वाटण्यावरून भाजपच्या गुंडांचा धुडगूस
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विजयाची खात्री झाल्याने बिथरलेल्या भाजपाच्या गुंडांनी सिडकोत शुक्रवारी मतदानाच्या स्लिप वाटणाऱ्या शिवसैनिकांना मारहाण केली. पोलीस...
अजित पवार गट, भाजपा, मनसे, वंचितला खिंडार; अपूर्व हिरे, अशोक मुर्तडक, पवन पवार, विक्रम नागरे यांचा शिवसेनेत प्रवेश
दिव्यांग मुलांच्या शिक्षणाला निवडणुकीचा फटका, ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’ची उच्च न्यायालयात याचिका
पेन्शनच्या नावाखाली वृद्धाला सात लाखांचा गंडा
छत्रपती संभाजीनगरात सापडले घबाड, सोन्या-चांदीने भरलेली गाडी जप्त
पढेंगे तो बढेंगे…! जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
मी भाजपमध्ये सडलो… कुजलो