मेकअप केल्यानंतर ‘या’ चुका करणे टाळा, त्वचेवर पडू शकतात सुरकुत्या
त्वचेवर कोणत्याही प्रकारचे डाग, सुरकुत्या पडू नये, त्वचा अगदी तजेलदार आणि चमकदार दिसावी अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रोडक्सचा वापर करत असतात. ज्यामुळे त्वचा बराच काळ मुलायम आणि स्वच्छ राहते. त्याचबरोबर दुसरीकडे पाहिले तर अशा अनेक महिला आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने स्किन केअर रूटीनचे पालन केल्याने त्वचेवर अकाली सुरकुत्या पडू लागल्या आहेत.
काही वेळा मेकअपशी संबंधित छोट्या-छोट्या चुकादेखील त्वचेच्या समस्या निर्माण करू लागतात. मेकअप करताना तुम्हाला माहित असतं की तुम्ही नकळत अशा अनेक चुका करता ज्या तुमच्या चेहऱ्यासाठी हानिकारक असतात. या छोट्या चुकांमुळे नंतर त्वचेचे मोठे नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया मेकअप केल्यानंतर कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.
मेकअप न काढता झोपणे
एखाद्या कार्यक्रमातून जेव्हा रात्री उशिरा घरी येता तेव्हा अनेक महिला या चेहऱ्यावरील मेकअप न काढता झोपी जातात. जवळजवळ प्रत्येकजण या चुकांची पुनरावृत्ती करत असतं. चेहऱ्यावरील मेकअपमुळे धुळीचे कण त्वचेवर चिटकून रहातात. यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि पुरळ येतात. म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप नीट काढा आणि फेस क्लीनरने चेहरा धुवा.
चेहरा एक्सफोलिएट न करणे
मेकअप काढल्यानंतर आपण अनेकदा त्वचेला एक्सफोलिएट करायला विसरून जातो. चेहरा एक्सफोलिएट न केल्याने त्वचेवरील मृत पेशी बाहेर पडत नाही याने त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे आपली त्वचा एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे त्वचेच्या मृत पेशी बाहेर पडतात. व आपला चेहरा तजेलदार दिसु लागतो.
स्वच्छ टॉवेल न वापरणे
चेहऱ्यावरील मेकअप काढल्यानंतर त्वचा स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही नेहमी स्वच्छ टॉवेलचा वापर करा. तुम्ही जर घरातील एखादया व्यक्तीने वापरलेल्या टॉवेलने तुमचा चेहरा साफ केला तर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ तसेच त्वचेचा संसर्ग होऊ शकतो.
त्वचेला मॉइश्चरायझिंग न करणे
मेकअप करण्यापूर्वी त्वचेला मॉइश्चरायझ करणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि मेकअप बराच काळ टिकून राहतो. मॉइश्चरायझिंग केल्याने त्वचेवर संरक्षक थर तयार होतो. त्यासोबतच मेकअप नीट काढून चेहरा धुवून घ्या व चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List