मंत्री झालेल्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विसर – शरद पवार
कार्यकर्त्यांनी मेहनत केली म्हणून आपले काही सहकारी मंत्री झाले. पण त्यांना याची आठवण राहिली नाही, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली. विरोधात असणाऱ्याला अडचणीत आणण्याची भूमिका आजचे नेते घेतात, असेही शरद पवार म्हणाले.
दरवर्षीच्या दिवाळीप्रमाणे आजही गोविंदबागेतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. त्या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी ही टीका केली.
शरद पवार म्हणाले की, 2019 साली आपण 54 जागा जिंकल्या. पण सत्तेचा गैरवापर करून आताचे सरकार स्थापन झाले. एकेकाळी देशात विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाकर होता, आता तोच महाराष्ट्र सहाव्या क्रमांकाकर गेला आहे. ज्यांच्या हाती सत्ता दिली, त्या लोकांना याची जाण नाही, जिह्यातील सामान्य माणासाचे हित जपण्यासाठी त्यांना आपण पदं दिली, कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून ते मंत्री झाले. पण या सगळ्यांची आठवण आपल्या सहकाऱ्यांना राहिलेली नाही.
1980 साली माझ्या पक्षातून 58 आमदार निवडून आले होते असे शरद पवार म्हणाले. मी कामानिमित्त परदेशात गेलो तेव्हा 58 पैकी 52 आमदार मला सोडून गेले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत 58पैकी 52 उमेदवार पराभूत झाले होते, असेही शरद पवार यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाचा निर्णय फायद्याचा
ट्रम्पेट या चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर निवडणूक आयोगाने रद्द केले आहे. त्यामुळे आपल्याला फटका बसणार नाही, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List