राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; विधानसभेपूर्वी कुणाला मिळणार आमदारकी? शिंदे गटाची नावं तर फायनल, भाजप, राष्ट्रवादीत कुणाची वर्णी?

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; विधानसभेपूर्वी कुणाला मिळणार आमदारकी? शिंदे गटाची नावं तर फायनल, भाजप, राष्ट्रवादीत कुणाची वर्णी?

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांच्या नियुक्तीला मुहूर्त लागण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांना पुन्हा धुमारे फुटले आहेत. या नियुक्ती करताना अर्थातच मर्जीतील कार्यकर्ता, पदाधिकारी, सामाजिक, जातीय समि‍करणांचा विचार होणार, काहींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित आहे. विधानसभेच्या तोंडावरच 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुहूर्त साधल्या जात असल्याने त्यातून काय संदेश सरकारला द्यायचा हे स्पष्ट आहे.

प्रलंबित आमदारकीला विधानसभेचा मुहूर्त

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा मुद्दा गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडला होता. महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला काही हिरवा कंदिल दाखवला नाही. त्यांनी नियुक्त्या दिल्या नाहीत. कोश्यारी यांनी मुद्दामहून अडवनूक केल्याचा आरोप करत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यात जुलै 2022 मध्ये सत्ता परिवर्तन झाले. महायुतीचे सरकार आले. आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

शिंदे गटाने घेतली आघाडी

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी एकनाथ शिंदे गटाने महायुतीत आघाडी घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांच्या 5 इच्छुकांची नावे भाजप पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली आहे. यामध्ये अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकसभेला ज्यांना डावलण्यात आलं. ज्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून येते. तर ज्यांना महामंडळ देण्याचे आश्वासन देण्यात आले, त्यांची पण वर्णी लावण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक पण ज्यांना उमेदवारी देणे अडचणीचे आहे, त्यांची या आमदारकीवर बोळवण करण्यात येणार आहे.

शिंदे गटाने जी नावं पुढं केली आहेत, त्यात मनीषा कायंदे, रविंद्र पाठक, चंद्रकांत रघुवंशी, हेमंत पाटील आणि संजय मोरे या पाच जणांची नावं असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अधिकृतपणे अजून पक्षाने याविषयीची माहिती दिलेली नाही. लवकरच यासंबंधीचा निर्णय महायुतीमधील तीनही पक्ष जाहीर करू शकतात.

मग कुणाच्या पारड्यात सर्वाधिक जागा?

राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांसाठी सुद्धा रस्सीखेच सुरू आहे. या आमदारांमध्ये आपले सर्वाधिक आमदार असावेत यासाठी भाजप आग्रही असल्याचे समजते. भाजपने 6 जागांवर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 3-3 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेनेलिया डिसूजा हिने केला पती रितेश देशमुख याच्याबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मध्यरात्री त्याने… जेनेलिया डिसूजा हिने केला पती रितेश देशमुख याच्याबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मध्यरात्री त्याने…
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाव आहे. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीजन 5...
Bigg Boss Marathi 5 : भाऊ इज बॅक ! रितेश देशमुखची बिग बॉसमध्ये पुन्हा एंट्री , ग्रँड फिनालेआधी देणार मोठा धक्का
अंकिता वालावलकर हिच्यावर मोठा आरोप, घरातील सदस्यानेच…
Rakhi Sawant : स्मशानभूमीतून आईच्या अस्थीही घेतल्या नाही, राखीचे रडून रडून डोळे सुजले; भारतात येण्याची तडफड
रोज दाढी करणे धोकादायक आहे का? किती दिवसांतून दाढी करावी? तज्ज्ञांनी दिला असा सल्ला
दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित, पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणी सुप्रिया सुळे यांची टीका
हिजबुल्लाहच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा, इस्त्रायलने हवाई हल्ला करत केला मोठा दावा