50 % पर्यंतचे आरक्षण 75% पर्यंत जाऊ द्या! शरद पवार यांचं मोठं विधान

50 % पर्यंतचे आरक्षण 75% पर्यंत जाऊ द्या! शरद पवार यांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाबद्दल आनंद व्यक्त करतानाच पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली. यावेळी आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर जेखील त्यांनी मोठं भाष्य केलं. केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावे आम्ही सगळे पाठिंबा देऊ अशी भूमिका देखील त्यांनी मांडली. मराठा आरक्षणासोबतच अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनाही आरक्षण मिळावे आणि ते देखील कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

पत्रकार परिषदेत आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, ‘आरक्षण मिळावं अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आहे. ते चुकीचे नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळतं त्याचंही रक्षण करणं त्याला धक्का न बसणं याबद्दलही लोकांच्या चर्चा आहेत’, असं मत शरद पवार यांनी मांडलं.

आपल्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना, ‘कालच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा मिळाला ते दिसलं आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यांना एकसुद्धा जागा मिळाली नाही त्यांनी इतरांच्या संदर्भात भाष्य करणं मीडियामध्ये नाव छापून येण्यापर्यंत हे ठीक आहे’, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

तमिळनाडूमध्ये 78 टक्के होतं तर महाराष्ट्रात 75 टक्के का होऊ शकत नाही?

‘आरक्षणाच्या बाबतीत असे आहे की 50 टक्क्यांच्यावर जाता येत नाही. 50 टक्क्यांच्यावर आरक्षण हवं असेल तर संसदेत कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे, जाऊ द्या 75 टक्क्यांपर्यंत. एक काळ असा होता की तमिळनाडू राज्यामध्ये आरक्षण जवळपास 78 टक्क्यांपर्यंत होतं. तमिळनाडूमध्ये 78 टक्के होऊ शकतं तर महाराष्ट्रात 75 टक्के का होऊ शकत नाही? म्हणजे 50 चं आता आहे, 75 होण्यासाठी 75 ने वाढवावं लागेल. 25 वाढवले की ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांच्याही विचार करता येईल. याच्यात कुठलाही वाद राहणार नाही आणि माझं स्पष्ट मत आहे यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, संसदेत विधेयक आणावे आणि आम्ही सगळे त्यांच्या बाजूने मतदान करून त्यांना साथ देऊ, अशी स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नागा चैतन्य – समंथा यांच्या घटस्फोटावर महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, प्रकरणर अडकणार कायद्याच्या कचाट्यात नागा चैतन्य – समंथा यांच्या घटस्फोटावर महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, प्रकरणर अडकणार कायद्याच्या कचाट्यात
Nagarjuna on Samantha and Naga Chaitanya Divorce: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर वादग्रस्त वक्तव्य करणं...
Urmila Matondkar च्या घटस्फोटाच्या चर्चा, बॉयफ्रेंड, नवरा, मुलांबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
नवरात्रोत्सवानिमित्त विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात फुलांची आरास; झेंडू, शेवंती, गुलाब, ऍस्टर आदी आठ प्रकारच्या दोन टन फुलांचा वापर
महाराष्ट्रामध्ये संघर्ष वाढला तर…! आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी मिंधे-फडणवीस सरकारला दिला इशारा
डॉक्टरने तोडले झाड : 50 हजारांचा दंड वसूल
ड्रोनच्या घिरट्यांनंतर रोषणगावात शेतवस्तीवर घरफोड्या
नगरकरांची सवलतीकडे पाठ; 24 दिवसांत फक्त साडेचार कोटी थकबाकी जमा