पुण्यानंतर मुंबईत धक्कादायक प्रकार, CSMT स्थानकाच्या टॅक्सी स्टॅण्डमागे महिलेवर सामूहिक बलात्कार

पुण्यानंतर मुंबईत धक्कादायक प्रकार, CSMT स्थानकाच्या टॅक्सी स्टॅण्डमागे महिलेवर सामूहिक बलात्कार

पुण्यानंतर मुंबईत धक्कादायक प्रकार घडला असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात एका 29 वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी सामूहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून

एबीपीच्या बातमीनुसार, ही घटना 22 सप्टेंबर रोजी घडली. ही पिडीत तरुणी सीएसएमटीच्या बाहेर एकटी होती. तिला एकटीला पाहून आरोपी तिच्याजवळ आला. आरोपी तिच्याजवळ येत असल्याचे पाहून तरुणीने आरडाओरड करायला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत आरोपीने तरुणीचे तोंड दाबले आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या टॅक्सी स्टॅण्डच्या मागे दोघा नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ती महिला त्यांच्या तावडीतून पळाली आणि त्यानंतर तिने स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

याप्रकरणाच्या पुढील तपासासाठी माता रमाबाऊ मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेनेलिया डिसूजा हिने केला पती रितेश देशमुख याच्याबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मध्यरात्री त्याने… जेनेलिया डिसूजा हिने केला पती रितेश देशमुख याच्याबद्दल अत्यंत हैराण करणारा खुलासा, म्हणाली, मध्यरात्री त्याने…
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाव आहे. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठी सीजन 5...
Bigg Boss Marathi 5 : भाऊ इज बॅक ! रितेश देशमुखची बिग बॉसमध्ये पुन्हा एंट्री , ग्रँड फिनालेआधी देणार मोठा धक्का
अंकिता वालावलकर हिच्यावर मोठा आरोप, घरातील सदस्यानेच…
Rakhi Sawant : स्मशानभूमीतून आईच्या अस्थीही घेतल्या नाही, राखीचे रडून रडून डोळे सुजले; भारतात येण्याची तडफड
रोज दाढी करणे धोकादायक आहे का? किती दिवसांतून दाढी करावी? तज्ज्ञांनी दिला असा सल्ला
दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित, पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणी सुप्रिया सुळे यांची टीका
हिजबुल्लाहच्या उत्तराधिकाऱ्याचा खात्मा, इस्त्रायलने हवाई हल्ला करत केला मोठा दावा