शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

शिवसेनेची वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेला ‘दसरा मेळावा’ दादर येथील शिवतीर्थावरच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दसरा मेळाव्यासाठी रीतसर परवानगी देणारे पत्र महापालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाकडून शिवसेनेला देण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्यामुळे लाखो शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली असून राजकीय विश्वाचेही लक्ष लागले आहे.

दरवर्षी दसर्‍या दिवशी होणारा शिवसेनेचा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल होत असतात. यावर्षी 12 ऑक्टोबर रोजी हा मेळावा होत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीला सुरुवातही करण्यात आली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय स्थितीवर काय भाष्य करतात, विरोधकांचा कसा समाचार घेतात, कुणावर आसूड ओढतात आणि कोणता नवा संदेश देतात याकडेही शिवसैनिकांचे लक्ष लागले असून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी अधिकृतपणे परवानगी देणारे पत्र पालिकेच्या ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित अंबी यांनी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांना याबाबत पत्र दिल्याचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी सांगितले.

 

अटी-शर्ती

  • दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी ५०० रुपयांच्या शुल्कासह २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालनही करावे लागणार असल्याचे परवानगीच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
  • शिवाय मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र, स्ट्रक्चरल इंजिनीयरचे स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मेळाव्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत वेळ राहणार असून पालिकेच्या अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे.
  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यास स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार