500 कोटींचा अ‍ॅप घोटाळा: एल्विश यादव, कॉमेडिअन भारती सिंह यांच्यासह 5 जणांना समन्स

500 कोटींचा अ‍ॅप घोटाळा: एल्विश यादव, कॉमेडिअन भारती सिंह यांच्यासह 5 जणांना समन्स

दिल्ली पोलिसांनी 500 कोटींच्या अ‍ॅप घोटाळ्याप्रकरणी यूट्युबर एल्विश यादव आणि कॉमेडिअन भारती सिंह यांच्यासह अन्य तिघांना समन्स पाठविण्यात आले आहेत. पोलिसांना 500 हून अधिक तक्रारदार मिळाले आहेत. त्यात आरोप लावण्यात आला आहे की, अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि युट्युबर्स यांनी आपल्या पेजवर HIBOX या मोबाईल अ‍ॅप्लीकेशनचा प्रचार केला आहे आणि अ‍ॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास आकर्षित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटाळ्याचा मुख्य आरोपी चेन्नई येथील शिवराम (30) याला अटक केले आहे. तक्रारीनुसार, सौरव जोशी, अभिषेक मल्हान, पुरव झा, एल्विश यादव, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, लक्ष्य चौधरी, आदर्श सिंह, अमित आणि दिलराज सिंह रावत यांच्यासह सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि युट्युबर्सनी या अ‍ॅपचा प्रचार केला आणि लोकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास आकर्षित केले.

पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी म्हणाले की, HIBOX एक मोबाईल अ‍ॅप्लीकेशन आहे, जे एका नियोजित घोटाळ्याचा भाग होते. डीसीपी यांनी सांगितले की, या अ‍ॅपच्या माध्यमातून आरोपीने दरदिवशी एक ते पाच टक्के रिटर्न्स मिळणार असल्याची हमी दिली होती. जो एक महिन्यात 30 ते 90 टक्क्यांच्या बरोबर आहे. या अ‍ॅपला फेब्रुवारी 2024 मध्ये लॉन्च केले होते. या अ‍ॅपमध्ये 30 हजारहून अधिक लोकांनी गुंतवणूक केली होती. सुरुवातीच्या पाच महिने लोकांना चांगले रिटर्न्स मिळाले. मात्र जुलैपासून ॲपने तांत्रिक अडचणी, कायदेशीर समस्या, जीएसटी समस्या इत्यादी कारणांमुळे पेमेंट थांबवले.

16 ऑगस्ट रोजी, पोलिसांना 29 पीडितांकडून इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) मध्ये HIBOX अ‍ॅप्लिकेशनविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रारदारांनी आरोप केला आहे की, त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 20 ऑगस्ट रोजी, विशेष सेलने विविध कलमांनुसार आणि आयटी कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
तुमची  सकाळची एक चुक डोकं आणि मानेचा कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते. नवीन अभ्यासात असे आढळले आहे की दररोज ब्रश करणारे...
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
महामारीसाठी तयार रहा, काळजी वाढवणारा निती आयोगाचा अहवाल
अखेर आज तो सुदिन अवतरला; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; राज्यातील नेते काय म्हणाले?
महाभारतात द्रौपदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रुपा गांगुली यांना अटक, कारण काय?
शिवतीर्थावर आवाज शिवसेनेचाच! पालिकेकडून मेळाव्यासाठी रीतसर परवानगी, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार