भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी 2 पत्नी, 3 अपत्यांची माहिती लपवून लाभाची पदे उपभोगली!

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी 2 पत्नी, 3 अपत्यांची माहिती लपवून लाभाची पदे उपभोगली!

पार्टी विथ डिफरन्स असा डांगोरा पिटणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे भांडे अखेर फुटले आहे. दोन पत्नी व तीन अपत्ये असूनही माहिती लपवून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये नगरसेवक पदापासून आमदारकीपर्यंत लाभाची सर्व पदे उपभोगली. निवडणूक आयोगाला मात्र थेट बनावट शपथपत्रे सादर करून मेहता यांनी त्यात खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातच मीरा रोडमधील सामाजिक कार्यकर्ते राजू गोयल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून नरेंद्र मेहता यांना यापुढे कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दाखल झालेल्या याचिकेमुळे मीरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले असून सर्व निवडणुका लढवताना निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दोन बायका व तीन अपत्ये असल्याची माहिती मेहता यांनी लपवली असल्याचा आरोप राजू गोयल यांनी आपल्या याचिकेत केला आहे. त्यांनी मीरा-भाईंदर महापालिकेच्या 2002, 2007 व 2012 अशा तीन वेळा निवडणुका लढवल्या. त्यानंतर तीन वेळा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातदेखील ते उतरले होते. मात्र त्यांनी आपणास दोन पत्नी व तीन अपत्ये असल्याची माहिती निवडणुकीच्या वेळी लपवली.

इन्कारही केला नाही

मेहता यांच्या विरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात 28 फेब्रुवारी 2020 रोजी दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील फिर्यादी पीडित महिलेने मेहता यांनी 2001 साली मंदिरात लग्न केल्याचे म्हटले आहे. तसेच तिला मेहता यांच्यापासून मुलगा असल्याचेही नमूद केले आहे. सदरच्या रिट पिटीशनमध्ये नरेंद्र मेहता यांनी न्यायालयाला सत्य प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात मेहता यांनी त्यांचे पीडिता महिलेसोबत 1999 ते 2020 पर्यंत आपले संबंध होते असे कबूल केले आहे. तिच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असल्याचा इन्कारही त्यांनी केलेला नाही.

ही घ्या गुन्ह्यांची यादी

  • नरेंद्र मेहता हे 2002 साली नगरसेवक असताना त्यांना 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते.
  • 2022 साली नवघर पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • बलात्कार, पर्यावरणाचा ऱ्हास, जमिनीवर कब्जा करणे यांसारखे 25 हून अधिक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
  • पदाचा दुरुपयोग करत आपल्या पंचतारांकित क्लबला बेकायदा चटई निर्देशांक मंजूर करून घेतले आहेत.
  • 2014 रोजी झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मेहता हे भाजपचे अधिकृत उमेदवार होते. त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रात त्यांना एक पत्नी व दोन मुले असल्याचे शपथपत्राद्वारे घोषित केलेले आहे.
  • प्रत्यक्षात मेहता यांना दोन बायका असून पहिल्या पत्नीपासून एक व दुसऱ्या पत्नीपासून दोन अपत्ये आहेत. निवडणूक लढवताना त्यांनी खरी माहिती शपथपत्रात दिली नाही. त्यामुळे ही लोकशाहीची चेष्टा असल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
  • मेहता यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढवण्यास मनाई करावी अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते राजू गोयल यांनी 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण तेथे न्याय न मिळाल्याने त्यांनी आता थेट हायकोर्टात धाव घेतली आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धाप लागली, घाम फुटला… तिरुपतीच्या दर्शनाला जाताना पवन कल्याण यांची झाली अशी अवस्था धाप लागली, घाम फुटला… तिरुपतीच्या दर्शनाला जाताना पवन कल्याण यांची झाली अशी अवस्था
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी तिरुपती मंदिरात बालाजींचं दर्शन घेतलं. गेल्या काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या...
आणखी एका लोकप्रिय भूमिकेने ‘तारक मेहता..’ला केला रामराम; चाहते नाराज
कळवा हॉस्पिटलमध्ये आले.. पाहणी करून निघून गेले; शिक्षणमंत्र्यांनी मध्यरात्री उडवली विषबाधाग्रस्त विद्यार्थ्यांची झोप
नागोठण्याची श्री जोगेश्वरी माता भैरवनाथ महाराज
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी 2 पत्नी, 3 अपत्यांची माहिती लपवून लाभाची पदे उपभोगली!
सर्वोच्च काय, कोणतेच न्यायालय सुरक्षित नाही; चक्क जिल्हा न्यायाधीशांच्या नावाने बनावट आदेश जारी!
Jammu kashmir election- मतदान झालं, पण निकालाआधीच मृत्युनं गाठलं; भाजप उमेदवाराचं निधन