इस्रायलने केली जमिनीवरील युद्धाची घोषणा, हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांशी चकमक; गाझातही हल्ले, 51 जणांचा मृत्यू

इस्रायलने केली जमिनीवरील युद्धाची घोषणा, हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांशी चकमक; गाझातही हल्ले, 51 जणांचा मृत्यू

इराणने इस्रायलवर तब्बल 400 क्षेपणास्त्रs डागल्यानंतर इस्रायल प्रचंड खवळले आहे. इस्रायलच्या सैन्याने आता लेबनॉनमध्ये जमिनीवरील लढाई सुरू केली असून 2 किलोमीटर आत घुसखोरी केली आहे. तसेच दक्षिण लेबनॉनमधील 24 गावे रिकामी करण्यास सांगितले असून रक्तपातात मोठय़ा प्रमाणावर नागरिकांचाही बळी जाऊ शकतो, असा इशाराही दिला आहे. दुसरीकडे इस्रायलने आज गाझापट्टीतही हल्ले केले. या हल्ल्यात 51 जणांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक जखमी झाल्याची माहिती पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, हिंदुस्थानने इराणमधील आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इराणसाठी प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच इराणमध्ये राहत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांच्याही हिंदुस्थानी दूतावास संपका&त असून त्यांना सतर्पतेचे आवाहन करण्यात आले आहे.

लेबनॉनमध्ये घुसलेल्या इस्रायली सैनिकांची हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांशी चकमक उडाली. यात इस्रायलच्या 8 सैनिकांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले. हिजबुल्लाहच्या विरोधात इस्रायलने पेजर, वॉकीटॉकी हल्ला केल्यानंतर इराणनेही इस्रायलवर क्षेपणास्त्रs डागली. त्यानंतर इस्रायलने लेबनॉनविरोधात जमीनीवरील युद्ध झेडले आहे. इस्रायल लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह, गाजात हमास तर इराण आणि येमेनमध्ये हुती बंडखोरांशी लढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धात उतरली असून दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेने सीरियात हवाई हल्ला केलाय. यात इसिसच्या 38 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे मध्य पूर्वेत युद्धाची ठिणगी पडली असून हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

– लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात तब्बल 18 वर्षांनंतर जमिनीवरील युद्ध सुरु झाले आहे. आज पहिल्यांदा हिजबुल्लाहचे दहशतवादी आणि इस्रायलच्या सैन्यदलामध्ये चकमक उडाली.
– इस्रायलकडूनही लेबनॉनवर हवाई हल्ले सुरू आहेत.
– दिल्लीत पोलिसांनी इस्रायली दूतावासाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

इराणने हल्ला करून मोठी चूक केली- नेतन्याहू

इराणने क्षेपणास्त्र हल्ला करून फार मोठी चूक केली असून त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. इराणने केलेला हल्ला फोल ठरल्याचे ते म्हणाले. तसेच अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.

संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांना इस्रायलमध्ये मनाई

इराणने मंगळवारी रात्री इस्रायलवर तब्बल 400 क्षेपणास्त्रs डागल्यानंतर इस्रायलने संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटेनियो गुटेरस यांना इस्रायलमध्ये येण्यावर बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला नाही. त्यामुळे त्यांना इस्रायलमध्ये पाय ठेवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली असून याबाबतचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हिजबुल्लाहचा इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला

हिजबुल्लाहने पुन्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रs डागल्याचे वृत्त आहे. आज दुपारी लेबनॉनने इस्रायलवर 50 क्षेपणास्त्रs डागल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. इस्रायली सैन्याने यातील काही क्षेपणास्त्रs पाडली. दरम्यान, इराणने केलेल्या हल्ल्यात इस्रायलचे हवाईतळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा इस्रायलच्या सैन्यदलाने केला आहे. काही कार्यालयीन इमारतींचे नुकसान झाले; परंतु हवाई दलाचे फार मोठे नुकसान झाले नाही, असेही इस्रायली सैन्यदलाने स्पष्ट केले आहे.

कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या

इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. ऑक्टोबरमध्येच कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलर्स होती. मात्र, इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हीच किमत 74 डॉलर्सवर गेली आहे. म्हणजेच एका दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती 3 डॉलर्सनी वाढल्या. हे लक्षात घेता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही आणखी वाढण्याची शक्यता असून महागाईचा आगडोंब उसळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटसह तिघांचा मृत्यू पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलटसह तिघांचा मृत्यू
बावधन परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिकांसह एका अभियंत्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत हेलिकॉप्टर जळून खाक झाले. उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या...
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन
Badlapur Sexual Assault : कोर्टाने फटकारताच चोवीस तासांत कोतवाल आणि आपटेला अटक
उपोषणाचे हत्यार उपसताच सोनम वांगचूक यांची सुटका, पंतप्रधान मोदी, शहा यांचे भेटण्याचे आश्वासन
10 ऑक्टोबरला महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा?
पंतप्रधान मोदींचा फोन मी नाकारला, कुस्तीपटू विनेश फोगाटचा दावा
इस्रायलने केली जमिनीवरील युद्धाची घोषणा, हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांशी चकमक; गाझातही हल्ले, 51 जणांचा मृत्यू