मलायका आरोराचं मराठीत पदार्पण; तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’मध्ये पहायला मिळणार जलवा

मलायका आरोराचं मराठीत पदार्पण; तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’मध्ये पहायला मिळणार जलवा

नुकताच ‘येक नंबर’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या चित्रपटाच्या ट्रेलरचा गाजावाजा सर्वत्र होताना दिसत आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत असून त्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. सोशल मीडियावर व्ह्यूजचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रेक्षकांकडून असा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला अजय-अतुल यांचं संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीने आवाज दिला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकरचं आहे. गणेश आचार्य यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलंय. या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी अभिनेत्री मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

या रॅपसाँगमधून मलायका तिच्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणार आहे आणि यात तिला साथ लाभणार आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवची. हे आयटम साँग ऐकायला जितकं एनर्जेटिक आहे तितकंच ते पाहायलाही कमाल आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. या गाण्याबद्दल अजय गोगावले म्हणाला, “पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग असायचे. हा प्रकार हल्ली जरा कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा आम्हाला येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात आयटम साँग असलं तरी ते विनाकारण नाही. कारण मुळात कथेची गरज होती. परंतु आपल्याकडे नृत्य म्हटलं की मराठी ठेका, आपली एक मराठी शैली येते. परंतु आम्हाला यात काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे याचाच आधार घेत आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणं करण्याचा एक नवीन प्रयत्न केला आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by T-Series (@tseries.official)

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. तर झी स्टुडिओजच्या उमेश कुमार बन्सल यांचंही या चित्रपटाला सहकार्य लाभलं आहे. येत्या 10 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश समृद्धी महामार्गावरील अपघात घटले, आरटीओच्या उपाययोजनांना असे आले यश
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील...
Love Life: 4 महिन्यात तिसरं लग्न मोडलं, अभिनेत्री आता चौथ्या लग्नासाठी सज्ज, आहे 3 मुलांची आई
श्वेता तिवारी पासून अरबाज खान पर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी केलंय पाकिस्तानी सिनेविश्वात काम
आमिर खानच्या पहिल्या पत्नीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
‘उदे गं अंबे..’ मालिकेत देवीचं हुबेहुब रुप साकारण्यासाठी महेश कोठारेंच्या पत्नीचं मोलाचं योगदान
भाजपाने लढण्याआधीच हार मानली, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार!
दिल्लीत दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, चार जणांना अटक