मसाबा गुप्ता लोकांच्या निशाण्यावर, थेट म्हणाली, माझ्याकडे त्यावेळी स्वयंपाक…

मसाबा गुप्ता लोकांच्या निशाण्यावर, थेट म्हणाली, माझ्याकडे त्यावेळी स्वयंपाक…

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आता लवकरच ती आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे. आता नुकताच मसाबा गुप्ता हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. मसाबा गुप्ता हिचे बोलणे ऐकून लोक तिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत. मसाबा गुप्ता हिने कोरोनाच्या काळात काय घडले हेच थेट सांगून टाकले आहे. मात्र, मसाबा गुप्ता हिचे हे बोलणे लोकांना अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. मसाबा गुप्ता म्हणाली की, कोरोनाच्या काळात स्वयंपाक बनवणाऱ्या महिलेला पैसे देण्यासही तिच्याकडे नव्हते.

मसाबा गुप्ता मुलाखतीमध्ये म्हणाली, 2020 मध्ये कोरोना आला आणि तोच काळ माझ्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट काळ ठरला. त्यावेळी माझ्याकडे स्वयंपाक तयार करणाऱ्या लेडीजला देण्यासाठी 12.000 रूपये देखील नव्हते. इतके जास्त वाईट दिवस त्यावेळी होते. मार्च 2020 मध्ये ज्यावेळी लॉकडाऊन लागले, त्यावेळी वाटले की हे दोन तीन दिवसांची गोष्ट असेल.

ते लॉकडाऊन 14 दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले. त्या 14 दिवसांमध्ये माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मसाबा हिने पुढे सांगितले की, त्यावेळी माझ्या बॅंक अकाऊंटमध्ये फक्त दोन लाख रूपये होते. मसाबाने पुढे म्हटले की, त्यावेळी मी पतीसोबत गोव्यात अडकले होते. माझ्या बिझनेस हेडने फोन करून सांगितले की, आता त्याच्याकडे पैसे नाहीत.

त्यावेळी त्याने म्हटले होते की, मार्चच्या शेवटी एप्रिलाच्या पहिल्या आठवड्यात सर्वकाही व्यवस्थित होऊ शकते. त्याने पुढे म्हटले होते की, माझ्याकडील सर्व पैसे संपले आहेत आता काहीच पैसे शिल्लक नाहीत, सर्वकाही संपले…कोणीच काहीही खरेदी करत नाहीये. त्यावेळी फॅशन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता.

आता मसाबा गुप्ता हिने केलेले हे विधान लोकांना आवडत नसल्याचे दिसत आहे. मसाबा गुप्ता हिला खडेबोल सुनावत एकाने लिहिले की, 12.000 रूपयांमध्ये घरातील सर्व किराना भरला जाऊ शकतो. कोरोनामध्ये तू जेवण तयार करण्यास तरी शिकायला हवे होते. लोकांकडे एक वेळेचे जेवण करण्यासही अजिबात पैसे नव्हते. लोक मसाबा हिच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज
नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार असून मुंबईची ग्रामदेवी असलेल्या श्री मुंबादेवी मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणार आहे....
तांत्रिक बिघाडाने ठाकुर्ली-कल्याण मार्गावर लोकल प्रवाशांची लटकंती
‘प्रवाहाती’मधून भरतनाटय़म नर्तिका गीता चंद्रन यांचा पाच दशकांचा प्रवास उलगडणार 
ऐकावं ते नवलच! अख्ख्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न फक्त दोन रुपये
सोनम वांगचुक यांना अटक हा मोदी सरकारचा मूर्खपणा, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर
परिणीती चोप्रा हिने शेअर केले पतीसोबतचे अत्यंत खास फोटो, अभिनेत्री रोमांटिक होत…
गरबा मंडपात गोमूत्र पाजून एण्ट्री द्या! भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य