धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी सत्ताधारी आमदारच आंदोलन करणार; सरकारची डोकेदुखी वाढली

धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी सत्ताधारी आमदारच आंदोलन करणार; सरकारची डोकेदुखी वाढली

एकीकडे मराठा आरक्षणवरुन मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु असतानाच ओबीसी यांचे देखील आंदोलन सुरु आहे. दोन समुहाची आंदोलनात धनगराचे आरक्षणावरुन रान पेटविण्याची भाषा कोणी विरोधकाने नव्हे तर सरकारमधीलच घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आदिवासी नेते विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या आंदोलनाची माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की सर्व आदिवासी संघटनांच्या प्रमुखांना आणि आमदारांना माझी विनंती आहे. सध्या रखडलेल्या पेसा भरती ( PESA – Panchayat(Extension To Scheduled Areas) Act ,1996) संदर्भात मध्यंतरी विद्यार्थी आणि पालकांसोबत आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी 15 तारखेपर्यंत भरती करु असे आश्वासन दिले होते. परंतू याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. धनगरांची जी घुसखोरी सुरु आहे की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासीत घ्या अशी राज्यभर चर्चा सुरु झालेली आहे. कायदा ड्राफ्ट झाला आहे.या संदर्भात आम्ही आदिवासी आमदारांनी पिचड, गावित साहेब, माजी खासदार हीना गावित अशा सर्वांनी 23 तारखेला बैठक घेतल्याचे झिरवळ यांनी यावेळी सांगितले.

आरक्षणातील घुसखोरी रोखा

त्यानंतर मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले की दोन दिवसात वेळ देतो. परंतू अद्यापही वेळ दिलेली नाही. दोनशे ते अडीचशे मुलं मुंबईतील माझ्या सुरुची निवासस्थानी ठाण मांडून आहेत. ती गावी जायला तयार नाहीत. आमचा निर्णय होत नाही. तोपर्यंत जाणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री, आदिवासी विभागाचे सेक्रेटरी चिफ सेक्रेटरी या सर्वाना निवदेन दिले आहे. आम्ही सर्व आमदार मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनसाठी महाराष्ट्रातीस सर्व आदिवासी संघटनांचे तरुण फोन करीत आहेत. त्यांना त्यांच्या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी सांगितले आहे. पेसा भरती सुरु करा आणि धनगरांची आमच्या आरक्षणातील घुसखोरी रोखा अशा आमच्या दोन मुख्य मागण्या असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका
बहुचर्चित आणि वादात राहिलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेटच्या विजयानंतर मातोश्रीवर जल्लोष झाला, घोषणाबाजी केली. दरम्यान, पदवीधर निवडणुकीनंतर पदवीधरांनी सरकारला धडा शिकवल्याचा...
या देशात याकूब मेमनच्या दफनासाठी जागा मिळते, पण अक्षयला… आरोपीच्या वकिलाची खदखद काय?
शबाना आझमी यांच्या ‘त्या’ विधानाने मोठ्या वादाला तोंड?, थेट म्हणाल्या, भारतात कायमच महिलांना…
हरयाणात बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तीन जणांचा मृत्यू
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, शरद पवारांनी भाजप आमदाराला सुनावले
Ratnagiri News – विधानसभा निवडणूक कधीही होवो दापोलीत शिवसेनाच, माजी आमदार संजय कदम यांना ठाम विश्वास
Photo – मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दणदणीत विजयानंतर मातोश्री येथे जल्लोष