अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण… कोर्टात नेमकं काय घडलं? 10 महत्त्वाचे मुद्दे काय?

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण… कोर्टात नेमकं काय घडलं? 10 महत्त्वाचे मुद्दे काय?

Akshay Shinde Encounter Hearing IMP : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेनंतर अक्षय शिंदेंच्या आई-वडिलांनी आरोप करत मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात तातडीने सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने सरकारसह पोलिसांना चांगलेच खडसावले.

अक्षयला खोट्या आरोपात गोवण्यात आले असून त्याचा राजकीय बळी देण्यात आला आहे, असा आरोपही त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला होता. याप्रकरणी रिट पिटीशन / ४१०७/२०२४ अंतर्गत हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. वकील अमित कटाकनवरे यांनी आरोपी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाची बाजू मांडली. तर सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कोर्टात सरकारची बाजू मांडली. न्यायमूर्ती रेवती मोहीती डेरे आणि चव्हाण यांच्या खंडपीठासमोर याबद्दलची सुनावणी पडली. यावेळी कोर्टाने प्रथमदर्शनी हा काही एन्काऊंटर वाटत नाही. पोलिसांवर संशय नाही पण याची योग्य चौकशी व्हायला हवी, असे न्यायमूर्तींनी म्हटले.

अक्षय शिंदे एन्काऊटर प्रकरणी कोर्टात उपस्थित केलेले 10 महत्त्वाचे मुद्दे

  • डोक्यात गोळी का मारली?, कोर्टाचा प्रश्न
  • पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर?, कोर्टाची विचारणा
  • पिस्तुल की रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली?, कोर्टाचा सवाल
  • आरोपीला काबू करायला हवं होतं, गोळी का मारली, 4 पोलीस एका काबू करु शकत नव्हते का?- कोर्ट
  • आरोपीने पिस्तुलचे लॉक ओपन करून राऊंड फायर केले का?, कोर्टाचा सवाल
  • पोलिसांची पिस्तुल अनलॉक का होती?, हायकोर्टाचा सवाल
  • सामान्य माणूस बंदुक चालवू शकत नाही- कोर्ट
  • याला एन्काऊंटर बोलू शकत नाही, एन्काऊंटरची व्याख्या वेगळी- कोर्ट
  • 3 गोळ्या मारल्या एक लागली, तर 2 गोळ्या कुठे?- कोर्ट
  • जप्त केलेलं हत्यार कुठे आहे?, कोर्टाचा सवाल
  • गोळी जवळून मारली गेली, शवविच्छेदन अहवाल बघून कोर्टानं निरीक्षण नोंदवलं
  • फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील- कोर्ट

पुढील सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार

दरम्यान याप्रकरणाचा तपास राज्य सीआयडीकडे देण्यात आला आहे. त्यांची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. यावर कोर्टाने सीआयडीचा तपास कधी पूर्ण होणार याची माहिती द्या, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच सीसीटीव्ही, सखोल पंचनामा कॉपी, सीडीआर, सीलबंद फॉरेन्सिक अहवाल या सगळ्यांचे जबाब द्या, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण? कशी होणार निवड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा खुलासा, काय आहे फॉर्म्युला
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी खलबतं सुरू आहेत. महायुतीत तर या पदावरून रस्सीखेच...
परिणीती चोप्रा हिने शेअर केला राघव चड्ढा याच्यासोबतचा ‘तो’ खास व्हिडीओ, अभिनेत्रीने पोस्टमध्ये थेट…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थानला 5 कोटींचा भूखंड फुटकळ दरात दिल्याचा आरोप, वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
दर्शनाला चाललेल्या कुटुंबाच्या रिक्षाला ट्रकची धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री व्हायचंय, पण गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच अडकते, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
अंत्यसंस्काराठी स्मशानात तिरडी घेऊन जाताना ग्रामपंचायतीचा निषेध, वाढवणा खुर्द येथील घटना
भाजपाने आरएसएसशी संबंधित लोकांना वाचविण्यासाठी शिंदेचा एन्काउंटर केला – विजय वडेट्टीवार