Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video

बदलापूरच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हटलंय. आधी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका कसा झाला ते समजून घ्या. बदलापुरातील 2 चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे नवी मुंबईच्या तळोजा सेंट्रल जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. मात्र आणखी एका गुन्ह्याच्या प्रकरणात ठाणे क्राईम ब्रांचची टीम ट्रान्सफर वॉरंटसह तळोजा जेलमध्ये आली. पोलीस निरीक्षक संजय शिंदे हेच ते PI आहेत, ज्यांनी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. संजय शिंदेंच्याच गोळीनं अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी साडे 5 वाजता ठाणे क्राईम ब्रांचच्या टीमनं आरोपी अक्षय शिंदेचा ताबा घेतला. संजय शिंदेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नेमकी घटना कशी घडली, याची माहिती दिलीय.

पोलीस व्हॅनमध्ये आरोपी अक्षय शिंदेंसह मागच्या बाजूला पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे आणि 2 पोलीस अंमलदार होते. ड्रायव्हरच्या बाजूला पोलीस निरीक्षक संजय शिंदे बसले होते. सोमवारी संध्याकाळी साडे 5 वाजता आरोपी अक्षय शिंदेला घेवून ठाणे क्राईम ब्रांचची टीम तळोजा जेलमधून निघाले. काही अंतरावर गाडी गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरेंनी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले पोलीस निरीक्षक संजय शिंदेंना फोन केला. निलेश मोरेंनी संजय शिंदेंना सांगितलं की, आरोपी अक्षय शिंदे शिवागीळ करतोय. मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेवून जात आहात, आता मी काय केलं आहे, असं रागानं अक्षय शिंदे बोलतोय त्यानंतर गाडी थांबवून पोलीस निरीक्षक संजय शिंदे मागच्या बाजूला बसले आणि अक्षय शिंदेला शांत करण्याचा प्रयत्न केला.

तोपर्यंत पोलिसांची गाडी जवळपास संध्याकाळी सव्वा 6 वाजता मुंब्रा बायपास रोडवर आली होती. त्याचवेळी अचानक आरोपी अक्षय शिंदेनं मला जाऊ द्या असं म्हणत पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरेंच्या कंबरेची पिस्तुल खेचली. झटापटीत पिस्तुल लोड झाली आणि 1 गोळी मोरेंच्या मांडीला लागल्यानं ते खाली पडले. आता मी एकालाही सोडणार नाही असं सांगून अक्षय शिंदेनं संजय शिंदे आणि पोलीस अंमलदाराच्या दिशेनं 2 गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी स्वत:कडील रिव्हॉल्वरनं आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेनं गोळी झाडली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ:-

सुषमा अंधारेंनी टीका करताना, माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं नाव घेतलंय. प्रदीप शर्मांसोबतही पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी काम केलंय. सध्या प्रदीप शर्मा शिंदेंच्या शिवसेनेत असून, वर्षभराआधी जामिनावर सुटका झालीय. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवणे आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा आरोपी आहेत.

आता सेल्फ डिफेन्समध्ये आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे कोण आहेत. पीआय संजय शिंदेंची मुंबई पोलीस दलातील कारकीर्द वादग्रस्त राहिली. अरुण टिकूच्या हत्येतील आरोपी विजय पालांडेला पळण्यासाठी मदत केल्याचा संजय शिंदेंवर आरोप होता. पालांडेच्या गाडीत संजय शिंदेंची वर्दी सापडल्यानं खळबळ उडाली होती. अरुण टिकू प्रकरणात संजय शिंदेंचं निलंबनही झालं होतं. संजय शिंदेंना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालक कार्यालयाला दिला होता. मात्र प्रस्ताव रद्द करुन 2014मध्ये संजय शिंदेंना पुन्हा पोलीस दलात घेतलं होतं. एन्काऊंटरच्या 3 तासांआधीच अक्षयच्या आईनं तळोजा जेलमध्ये त्याची भेट घेतली होती. मुलाला मारुन टाकल्याचा आरोप त्याच्या आईनं केलाय. सरकारकडून एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिलेत आणि CIDकडून चौकशी सुरुही झालीय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : पोलिसांच्या व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचं एन्काऊंटर, पाहा Video
बदलापूरच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हटलंय. आधी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका...
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला वेगळं वळण, हायकोर्टाने घेतली दखल
मुनव्वर फारुकी याने मुंबईत खरेदी केले नवीन घर, किंमत तब्बल इतके कोटी आणि…
Ind Vs Ban 2nd Test 2024 – BCCI चा मोठा निर्णय, टीम इंडियाचे हे 3 खेळाडू दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीत
अक्षय शिंदेच्या मृत्यूचे खरे कारण समोर, 7 तास शवविच्छेदन; अहवालामध्ये मोठा खुलासा काय?
चोर समजून दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतली दखल
Video – पेन्शनसाठी 70 वर्षीय वृध्द महिलेची पायपीट, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ व्हायरल