ग्रीन टीला विसरा आता वजन कमी करायचं तर ऑलिव्ह टीचा पर्याय आजमवा

ग्रीन टीला विसरा आता वजन कमी करायचं तर ऑलिव्ह टीचा पर्याय आजमवा

आपले जीवन इतके धावपळीचे बनले आहे की आपण आपल्यासाठी जराही वेळ काढू शकत नाही. नोकरी, कुटुंब आणि अनेक बाबींवर लक्ष ठेवताना आपल्या शारीरिक गरजा आणि मानसिक समस्यांकडे आपण लक्ष देत नाही.त्यामुळे तरुणपणीच अनेक व्याधी जडू लागल्या आहेत. तणावातून मुक्त होण्यासाठी तरुण चहा आणि कॉफी बेस्ट मानतात. परंतू ग्रीन टी सोबत ऑलिव्ह टी (Olive Tea) आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. ऑलिव्ह वनस्पतीची पाने ( जैतून ) पासून बनविलेला हा चहा आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ऑलिव्ह टीपासून शरीर, मूड रिलॅक्स होण्यास मदत होतेच शिवाय अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. तज्ज्ञाच्या मते ऑलिव्ह टी प्यायल्याने अनेक फायदे होतात.

ऑलिव्ह ऑईलचे फायदे तर आपल्याला माहीती आहेतच. तसेच ऑलिव्हची पाने देखील आरोग्यासाठी खूप चांगली असतात. ही पाने पोषकतत्वांनी पुरेपूर असतात. एण्टी ऑक्सीडेंट यात असतात.ऑलिव्ह तेलात एण्टी ऑक्सीडेंटचे गुण ग्रीन टीपेक्षाही अधिक असतात. ऑलिव्ह टी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असते.

हृदयाचे आरोग्य राखते

अनेक संशोधनातून एक गोष्ट उघड झाली आहे की जैतूनच्या पानांत अनेक गुण असतात. जे बॅड कोलेस्ट्रॉल तयार होण्यापासून रोखतात. त्यामुळे तुमेच ब्लड प्रेशर कमी राहण्याबरोबर हृदया संबंधीच्या आजारांचा धोका कमी करतात.

ब्लड शुगरला कंट्रोल करते

ऑलिव्ह टीत भरपूर प्रमाणात एंटी ऑक्सीडेंट गुण असतात. त्यामुळे तुमचे ब्लड शुगर राखण्यासाठी ऑलिव्ह टी फायदेशीर ठरते.तसेच शरीरात इन्सुलीन तयार करण्यासाठ देखील हा ऑलिव्ह टी गुणकारी ठरतो.

रोगकारकशक्ती मजबूत

ऑलिव्ह टीमध्ये लियोरोपिन आणि हायड्रोलिसिस सारखे तत्व आढळतात, जे आपले आरोग्य चांगले राखत रोग प्रतिरोधक क्षमता वाढविण्यासाठी मदत करतात.

एंटीऑक्सीडेंट गुण

ऑलिव्ह टीमध्ये भरपूर प्रमाणात एंटी ऑक्सीडेंट गुण आढळतात, जे फ्री रेडिकल्सशी लढतात त्यामुळे कॅन्सर, डायबिटीज, अल्झायमर सारख्या आजारापासून बचाव करते.

ब्लड प्रेशर नियंत्रिक राखते

काही अभ्यासानूसार ओलिव्ह ऑईलची पाने चहासारखी उकळून तो रस प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

वजन कम करायला मदत करते

ऑलिव्ह झाडांच्या पानात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे तुमची भूक कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळे वजन कम होण्यासाठी मदत होते.

ऑलिव्ह टीचे अन्य फायदे

ऑलिव्ह टीचे सेवन केल्याने मूड चांगला होतो. तसेच ताण आणि थकवा कमी करण्यास मदत होते. तसेच शरीराला नवी ऊर्जा मिळते. वयाआधीच येणारे वृद्धत्व रोखण्यास मदत होते. यासह स्नायूंमध्ये गोळे येणे, स्नायू अखडणे यासारख्या तक्रारी देखील दूर होतात. तसेच आपली त्वचा आणि केसांसाठी देखील ऑलिव्ह टी उत्तम आहे.

( सूचना : ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहीतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा  )

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकवणार, रत्नागिरी सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक यांचा निर्धार
गणेशोत्सवापूर्वी भगवा सप्ताहामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. त्या माध्यमातून शिवसैनिकांनी पक्षाचे मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवले....
Nagar News – नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू
Pune News – पुण्यात मंगळसूत्र चोरणारे दोघे सराईत अटकेत, विश्रांतवाडी पोलिसांची कारवाई
Latur News – मराठा आरक्षणासाठी पती-पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, विषारी औषध पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न
दप्तर आणले नाही म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करत वीजेचा शॉक दिला; शिक्षकाचे क्रूर कृत्य
Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारेखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज
छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली, मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल