ब्रेकअपनंतर 17 वर्षांनी शाहिद कपूरविषयी करीना झाली व्यक्त; म्हणाली “त्याच्याशिवाय..”

ब्रेकअपनंतर 17 वर्षांनी शाहिद कपूरविषयी करीना झाली व्यक्त; म्हणाली “त्याच्याशिवाय..”

अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांचं नातं इंडस्ट्रीत बरीच वर्षे चर्चेत होतं. जेवढी चर्चा त्यांच्या नात्याची झाली, तेवढीच चर्चा त्यांच्या ब्रेकअपचीही झाली. 17 वर्षांपूर्वी या दोघांचा ‘जब वी मेट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. इतकंच नव्हे तर आता 17 वर्षांनंतरही या चित्रपटाची प्रेक्षकांमधील क्रेझ कायम आहे. यामध्ये शाहिदने आदित्यची आणि करीनाने गीतची भूमिका साकारली होती. ब्रेकअपनंतर शाहिद आणि करीना यांनी एकमेकांसमोर येणं टाळलं होतं. कार्यक्रमांमध्ये जरी योगायोगाने दोघं एकमेकांसमोर आले, तरीही त्यांनी कधीच संवाद साधला नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच शाहिदविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. शाहिद कपूरशिवाय गीतची भूमिका इतकी गाजू शकली नसली, असं तिने म्हटलंय.

‘ब्रुट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत करीनाला ‘जब वी मेट’ या चित्रपटाविषयी प्रश्न विचारण्यात आला. या चित्रपटाविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी तिला सर्वाधिक कोणती गोष्ट आवडली, असा सवाल करीनाला करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “सर्वकाही.. मी तुम्हाला सांगते की मला सर्वकाही आवडलं. गीत ही सर्वार्थाने भारतीय अभिनेत्री आहे. त्या भूमिकेची प्रत्येक गोष्ट मला आवडली. प्रत्येकाला गीतसारखं आयुष्य हवं असतं, तिच्यासारखं वागायचं असतं. आजही जेव्हा मी हा चित्रपट पाहते, तेव्हा मला ते खूप खास वाटतं.”

“गीतची भूमिका आदित्यपेक्षा प्रचंड विरोधातली होती. मी याठिकाणी शाहिदचे नक्कीच आभार मानू इच्छिते. कारण त्याने या चित्रपटात अप्रतिम काम केलंय. आम्हा दोघांची ऊर्जा त्या भूमिकांसाठी पूरक ठरली. त्याच्याशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता”, असं ती पुढे म्हणाली. ‘जब वी मेट’ हा चित्रपट ऑक्टोबर 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 50.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. हिंदीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचं तमिळ आणि तेलुगूमध्येही डबिंग करण्यात आलं होतं.

‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच शाहिद आणि करीनाच्या नात्यात फूट पडली होती. ब्रेकअपनंतर त्यांनी 2016 मध्ये ‘उडता पंजाब’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या ब्रेकअपविषयी ‘जब वी मेट’चा दिग्दर्शक इम्तियाज अली एका मुलाखतीत म्हणाला होता, “माझ्या चित्रपटाचं शूटिंग अखेरच्या टप्प्यात असताना त्या दोघांचा ब्रेकअप झाला. चित्रपटाचं बऱ्याच अंशी शूटिंग झालं होतं. त्यांच्या ब्रेकअपनंतर अवघ्या दोन दिवसांचं शूटिंग बाकी होतं. पण तरीही त्यांच्या ब्रेकअपचा कामावर अजिबात परिणाम झाला नव्हता. दोघंही खूप प्रोफेशनल आहेत. त्यांच्या खासगी आयुष्यात जे काही घडलं होतं, त्याचे कोणतेच पडसाद सेटवर उमटले नव्हते.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का? …तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का?
रिपब्लिकन ऐक्य हे तर समाजाचं स्वप्न आहे. विविध गटा तटात विखुरलेल्या नेत्यांनी एक मोट बांधून निवडणुकीला सामोरं जावं अशी समाजाची...
सत्यपाल मलिक उद्धव ठाकरे यांच्या भेटीला; भाजपवर घणाघाती टीका करत म्हणाले, सरकार तर…
शूटिंग सुरू असताना सेटवर अत्यंत मोठा अपघात, अभिनेत्रीचा जळाला चेहरा, अंकिता लोखंडे धावली मदतीला आणि पुढे…
दहा वर्ष लहान पतीसोबत अभिनेत्रीने केला रोमान्स, लिपलॉक करताना आई वडिलांना बघताच मुलीने थेट…
श्रद्धा कपूरच्या कुटुंबातील लोकप्रिय अभिनेत्री दिसणार सलमान खानच्या शोमध्ये? मोठी अपडेट समोर
अरविंद केजरीवाल दिल्लीतील मुख्यमंत्री निवास लवकरच सोडणार; केंद्राकडे निवासस्थानाची मागणी
राज्यातूनच नाही, तर देशभरातून भाजपचा सफाया निश्चित; सत्यपाल मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल