Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढे ढकलण्यावरुन मुंबई हायकोर्टानं सरकारला दणका दिलाय. उद्या होऊ घातलेली निवडणूक पुन्हा लांबणीवर टाकल्यामुळे ठाकरे गटाच्या युवा सेनेनं हायकोर्टात धाव घेतली. त्यावर तातडीनं निवडणुकीचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत. विद्यापीठ सिनेट निवडणूक काय असते. कोण मतदार असतात. सिनेटचे अधिकार काय. जाणून घ्या. सिनेटचा मराठी अर्थ अधिसभा असा होता. ज्याप्रमाणे विधीमंडळात विधानसभा असते., तिथं कायदे-धोरणं ठरवली जातात. तसेच विद्यापीठाच्या अधिसभेत अर्थात सिनेटमधले लोक विद्यापीठाची फी, धोरणांसह विविध निर्णय घेतात.

सिनेटमध्ये एकूण 41 सदस्य असतात. त्यापैकी 10 सदस्य हे पदवीधरांकडून निवडले जातात १० महाविद्यालयांतल्या प्राध्यापकांकडून 10 प्राचार्यांकडून 6 संस्थाचालकांकडून 3 विद्यापीठातल्या अध्यापक गटाकडून याशिवाय विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आणि सचिव असे २ सदस्य मिळून सिनेटमध्ये एकूण 41 सदस्य असतात यापैकी आता ज्या निवडणुकीचा वाद सुरुय तो या पदवीधरांकडून निवडून जाणाऱ्या १० सदस्यांचा आहे.

पाहा व्हिडीओ:-

सिनेट निवडणुकीत प्रत्यक्ष पक्ष उतरत नसले तरी त्यांच्या युवा संघटना सहभागी होतात. याआधी 2018 ला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक झाली होती. ज्यात पदवीधरांकडून निवडून गेलेल्या १० पैकी १० जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला होता. ही निवडणूक ऑगस्ट 2022 ला होणं अपेक्षित होतं. मात्र सरकारनं ती निवडणूक पुढे ढकलली. तब्बल दीड वर्षांनी म्हणजे मार्च-फेब्रुवारी 2024 ला निवडणूक घेण्याचं सांगितलं गेलं. त्यादरम्यान ठाकरे गटानं उमेदवारी न दिलेले 3 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावरुन फोडाफोडीचा आरोपही रंगला होता. मात्र मार्च-फेब्रुवारी 2024 ची तारीख पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली. पुढे ऑगस्ट 2024 ला परिपत्रक काढण्यात आलं की सप्टेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जातील. आता 2 दिवसांवर निवडणूक असताना पुन्हा सरकारनं परिपत्रक काढून निवडणूक पुढे ढकलली. त्याविरोधात ठाकरे गटाची युवासेना कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं सरकारला दणका देत निवडणुका तातडीनं घेण्याचे आदेश दिले.

2010 ला जेव्हा सिनेट निवडणूक झाली होती., तेव्हा 10 पैकी 8 सदस्य ठाकरेंच्या शिवसेनेचे जिंकून आले. त्यापुढची निवडणूक 2015 ला होणं अपेक्षित होतं. मात्र तेव्हाही शिक्षणखातं भाजपकडे असल्यामुळे निवडणूक होऊ दिली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय, अखेर 2015 निवडणूक 3 वर्ष लांबवून 2018 ला घेण्यात आली. आणि आता पुन्हा 2022 ला होणारी निवडणूक 2 वर्ष लांबवली गेली. भाजपचे आशिष शेलार, विनोद तावडे, प्रवीण दरेकर, काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड या नेत्यांची राजकीय कारकिर्द सिनेट निवडणुकांद्वारेच सुरु झाली. मात्र यंदा निवडणूक ढकलाढकलीमुळे भाजपची विद्यार्थी शाखा असलेल्या अभाविपनं सुद्धा सरकारवर नाराजी व्यक्त केलीय.

यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेनं 10 जागांसाठी १० अर्ज भरले. भाजपच्या अभाविपनं १० जागांसाठी १० अर्ज भरले तर कपिल पाटलांच्या छात्र भारतीनं १० पैकी 5 जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र मनसे आणि शिंदे गटाच्या विद्यार्थी शाखांनी एकही उमेदवाराचा अर्ज दिलेला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू Reel बनवण्याच्या नादात प्राण गमवावे लागले, दुचाकीवर व्हिडीओ बनवताना मित्रांचा मृत्यू
सोशल मीडियावर Reel बनवणाऱ्या तरुण तरुणींची संख्या लाखात आहे. व्हायरल होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता धोकादायक पद्धतीने व्हिडीओ बनवून...
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाची कर्नाटकात पुनरावृत्ती, आधी हत्या केली; मग मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : विद्यापीठ सिनेट निवडणुक नेमकी काय असते? जाणून घ्या
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : मुस्लिम लांगुलचालनाची दवाब मान्य नाही, शाब्दिक चकमक, पाहा Video
धारावीत ‘मशिदी’वरुन तणाव, नितेश राणे यांची टीका
डीपी जळाली की इंजिनियरला हजार रुपये द्यायचे, तीन पिढ्यांपासून वीज बिल भरत नाही! मोदींच्या मंत्र्याने दिली वीजचोरीची जाहीर कबुली
जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे