Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागतायेत, लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागतायेत, लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

ओबीसी आंदोलक, लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ओबीसी आरक्षणावरुन निशाणा तर साधलाच. पण दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना प्रोटेक्शन देणारे मुख्यमंत्री असून उमेदवारी देतानाही 20-20 कोटी मागत असल्याचा आरोप करुन हाकेंनी खळबळ उडवलीय. जरांगे पाटलांचं 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु आहे. तिथून काही अंतरावरच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करतायत. मात्र अचानक हाकेंनी, मुख्यमंत्री शिंदेंवर जळजळीत टीका केलीय. ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाट वाटते असं टीकास्त्र हाकेंनी सोडलंय.

पाहा व्हिडीओ:-

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. जरांगेंच्या याच मागणीला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे. आता तर निवडणूकच ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार असं हाके म्हणालेत. हाकेंच्या आरोपांना आणि टीकेला शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाईंनी उत्तर दिलंय..तर, सरकारला मागण्या मान्य न केल्यास इशारे जरांगेंवरही हाकेंनी टीका केली. हाके आणि वाघमारेंच्या उपोषणाला 2 दिवस झालेत. तर चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडलीय. मात्र उपोषणावर जरांगे ठाम आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन चिमुरडय़ा विद्यार्थिनींवर व्हॅनचालकाकडून अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना; नराधम गजाआड दोन चिमुरडय़ा विद्यार्थिनींवर व्हॅनचालकाकडून अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना; नराधम गजाआड
शहरातील बाल लैंगिक अत्याचाऱ्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच पुण्यातही स्कूल व्हॅन...
चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल राठोड
100, 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद
ग्रॅण्ट रोडमधील इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू
Cancer: तुमची सकाळची एक चुक डोकं आणि मानेच्या कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, अभ्यासात धक्कादायक निष्कर्ष
कोणी पैसे देत का पैसे! पाकिस्तानी खेळाडूंचे बेकार हाल, चार महिन्यांपासून पगारच मिळाला नाही
निवडणुकांच्या तोंडावर का होईना अखेर केंद्र सरकार झुकलं… मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया