देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान, गृहमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी गल्लीबोळात फिरताहेत! – संजय राऊत

देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान, गृहमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी गल्लीबोळात फिरताहेत! – संजय राऊत

जागावाटपाबाबत दसऱ्याच्या आत सगळे चित्र स्पष्ट होईल. आमच्या जागावाटपासाठी दिल्लीतून कुणाला यावे लागणार नाही. इथे देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान जागावाटपासाठी येत आहेत. देश वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान, गृहमंत्री गल्लीबोळात फिरत आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

आज पंतप्रधान ठाण्यात येत आहेत. उद्या कोपरीला जातील, परवा पाचपाखाडीला, मग नवपाडा, घंटारी, भांडूप, कांजूलाही जातील. पंतप्रधानांनी पंतप्रधानासारखे वागायला हवे. देशाचा पंतप्रधान, गृहमंत्री असा गल्लोबाळात प्रचार करताना कधी पाहिला आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, सरदार पटेल की मुंबईत किंवा गुजरातमध्ये जागावाटपाला येऊन बसायचे का? त्यांनी देशाचा, राष्ट्राचा विचार केल्याने त्यांना सरदार म्हणतात. वॉर्डा वॉर्डात जाऊन ते निवडणुकीचा प्रचार करत नव्हते. एकच सभा घ्यायचे आणि ते पुरेसे असायचे. पण आताचे गृहमंत्री आणि पंतप्रधान देश वाऱ्यावर सोडून गल्लीबोळात प्रचाराला फिरत आहेत. वन नेशन, वन इलेक्शन यांना झेपणार आहे का? गृहमंत्री अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात फिरत आहेत. पंतप्रधांनांनीही एकाच मेट्रोचे सहा वेळा उद्घाटन केले. आज घो़डबंदर रोडला येत आहेत. आधी तिथल्या वाहतुकीची समस्या सोडला, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

वोट जिहाद हा भाजपच्या डोक्यातील कचरा

वोट जिलादचा आरोप करणाऱ्या भाजपलाही संजय राऊत यांनी झोडपले. हिंदू, मुसलमान, जैन, पारशी, शिख, बौद्ध, ख्रिश्चन हे सगळे या देशाचे नागरिक आहेत. ते सगळेच मतदान करतात. वाट जिहात असेल तर भाजपने मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकचा कायदा कशासाठी आणला? महाराष्ट्रात गुजराती लोकं भाजपला मतं देतात असे कळते, त्याला गुजरातींचा वोट जिहाद बोलणार का? फडणवीस सारख्या नेत्यांना देशाचे पुन्हा तुकडे करायचे आहेत का? असा सवालही राऊत यांनी केला. तसेच वोट जिहाद हा भाजपच्या डोक्यातील कचरा असल्याचेही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी सांगितलं महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र; म्हणाले, “भाजप आणि गद्दार गटांचा…”

सगळ्या बोटांचा हिशेब होणार

नांदेडमधील लोहा येथे सोशल मीडियावर भाजपबाबत भावना व्यक्त करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्याला काही गुंडांनी घेरून हल्ला केला आणि त्याची बोटं कापली. कुठे आहेत गृहमंत्री? पोलीस काय करत आहेत? समान नागरी कायद्याप्रमाणे आम्हीही कायदा हातात घेऊ शकतो आणि बोटं कापू शकतो. शिवसैनिकांमध्ये ती क्षमता आहे. भाजपला वाटते कायदा त्यांच्या घरी भांडी घासतो. दोन महिने थांबा, सगळ्या बोटांचा हिशेब होणार, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची चिन्ह आहेत. भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ...
‘अनुपमा’च्या ‘काव्या’कडून रुपाली गांगुलीवर धक्कादायक आरोप; म्हणाली ‘ती दुतोंडी..’
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाणने सांगितला लग्नाचा प्लॅन
निक्की तांबोळीने सूरजला दिला शब्द; म्हणाली, मी जिंकली तर ट्रॉफी…
तुमच्याकडून ही अपेक्षा नाही..; महात्मा गांधींबद्दल ‘लक्ष्मण’ यांचं वक्तव्य ऐकून नेटकरी नाराज
जादू की झप्पी आणि पप्पी कुणाला? गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मध्ये जाणार; डंके की चोट पर घेणार मानधन
विधानसभेवेळीच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा