गळीताची तयारी, साखरपट्टय़ात कारखान्यांची लगबग; हंगामपूर्व खर्चासाठी किमान दीड हजार कोटींची आवश्यकता

गळीताची तयारी, साखरपट्टय़ात कारखान्यांची लगबग; हंगामपूर्व खर्चासाठी किमान दीड हजार कोटींची आवश्यकता

गेल्या आठवडय़ात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील महिन्यात 15 नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. गळीत हंगामाच्या तयारीसाठी साखरपट्टय़ात कारखान्यांची लगबग सुरू झाली आहे. जिह्यात साधारण एक कोटी 63 लाख 368 हेक्टरवर उसाचे पीक आहे. महापुरामुळे सरासरी 20 टक्के तूट होऊन किमान 115 लाख मे. टनाहून अधिक ऊस उत्पादीत होईल, असा अंदाज आहे.

दरम्यान, हंगाम सुरू करण्यापूर्वी मेन्टनन्स खर्च, तोडणी टोळ्यांना ऍडव्हान्स, शासकीय कर व इतर देणी अशी हंगामपूर्व कामे उरकण्याची कारखाना व्यवस्थापनाकडून घाई सुरू आहे. कोल्हापूर जिह्यातील 22 कारखान्यांना हंगामपूर्व खर्चासाठी किमान दीड हजार कोटींची गरज आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यातील अनेक कारखान्यांना 150 कोटींची मदत होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ सक्षम व काटेकोर व्यवस्थापन असलेले कारखानेच चालू हंगामात तग धरतील, अशी साखर तज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूर जिह्यात सर्वच साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्न पार पडण्याची आशा आहे. दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ऊसतोडणी मजूर मोठय़ा संख्येने जिह्यात येण्यास सुरुवात होईल. विदर्भ, मराठवाडय़ात मागील दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने कारखान्यांना ऊसतोडणी मजुरांचा तुटवडा जाणवणार आहे. साखर कारखाना स्तरावर ऊसतोडणी टोळ्या निश्चित करण्यासह तांत्रिक साफसफाईचे काम जोरात सुरू आहे. आता परतीच्या पावसाने साथ देण्याची गरज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का भाजपमधील बडा नेता शरद पवार गटाच्या मार्गावर, पुणे जिल्ह्यात पक्षाला बसणार धक्का
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाला धक्का बसणार असल्याची चिन्ह आहेत. भाजपचे पुणे जिल्ह्यातील माजी मंत्री कमळ...
‘अनुपमा’च्या ‘काव्या’कडून रुपाली गांगुलीवर धक्कादायक आरोप; म्हणाली ‘ती दुतोंडी..’
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरज चव्हाणने सांगितला लग्नाचा प्लॅन
निक्की तांबोळीने सूरजला दिला शब्द; म्हणाली, मी जिंकली तर ट्रॉफी…
तुमच्याकडून ही अपेक्षा नाही..; महात्मा गांधींबद्दल ‘लक्ष्मण’ यांचं वक्तव्य ऐकून नेटकरी नाराज
जादू की झप्पी आणि पप्पी कुणाला? गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मध्ये जाणार; डंके की चोट पर घेणार मानधन
विधानसभेवेळीच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा