अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात नवरात्रौत्सवाला प्रारंभ, लाखो भाविक घेणार दर्शन

अंबाजोगाईतील योगेश्वरी मंदिरात नवरात्रौत्सवाला प्रारंभ, लाखो भाविक घेणार दर्शन

बीडच्या अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बीडचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे. नवरात्र पर्वकाळात पाच लाखापेक्षा जास्त भाविक अंबाजोगाई येथे दाखल होणार असल्याने याची जय्यत तयारी योगेश्वरी देवल कमिटी कडून करण्यात आली आहे.

नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मंदिर पहाटे 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असणार आहे. नवरात्र पर्वकाळात नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांच्या पैठणीने तसेच अलंकाराने देवीची पूजा करण्यात येणार आहे. पहाटे मंदिर उघडल्यावर काकडारती करण्यात येते. त्यानंतर दुपारच्या पूजेची आरतीआधी देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो रात्री शेजारतीच्या वेळेला आरती करून मंदिर पुन्हा बंद केले जाते. योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी महिला व पुरुषाच्या स्वतंत्र रांगा तसेच पासची एक वेगळी रांग असणार आहे. हा पास भाविकांना 100 रू देऊन घेता येईल. यंदा अपंगांसाठीही व्हील चेअरची सुविधा देवल कमिटी कडून उपलब्ध करण्यात आलेली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी यावेळी भाविकांना भेटणार आहे यामध्ये भजन संध्या, भक्ती गीते, पचन असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.

अष्टमीला होम हवन पूर्णाहुती नंतर दसऱ्याला देवीची पालखी सिमोलंघनासाठी जाते. योगेश्वरी मंदिर पासून,मंडी बाजार, रविवार पेठ,खडकपुरा वेस,परळी वेस, अण्णाभाऊ साठे चौक,बस स्टँड,मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक गुरुवार पेठ या मार्गावरून पालखी पुन्हा मंदिरात दाखल होते.कोकणवासीयांची कुलदेवता अशी योगेश्वरी देवीची ओळख असल्याने राज्यातील भाविक तर दर्शनासाठी येत असतात याचबरोबर परराज्यातील ही भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दर्शनाचा येतात.

काय आहे आख्यायिका?

माता योगेश्वरी हे पार्वतीचे रूप मानले जाते. योगेश्वरी देवीचा विवाह उद्यापासून जवळच असलेल्या हत्तीखाना सभागृहात परळीच्या वैद्यनाथा सोबत होणार होता. हा विवाह सकाळी कोंबडा अरवायच्या आतच हा होईल अशी अट योगेश्वरी देवीकडून घातली गेली होती.अट पूर्ण न झाल्याने हत्तीखाना येथे आलेले सर्व देवता तिथेच मूर्तीरूपात स्थापित झालेले आजही दिसतात. तेव्हापासूनच योगेश्वरी देवीचे वास्तव्य अंबाजोगाईत आहे.

हेमाड पंथी बांधकाम,मंदिराचे शिखर वेधते भाविकांचे लक्ष

मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे, आभाऱ्यासमोरील मंडप खांबावर उभा केलेला दिसतो.योगेश्वरी मंदिराच्या कळसाला पाच मजले असून शिखरावर गणेशाचे योगिनी रूप ,देवी तसेच विष्णूंच्या वेगवेगळ्या अवताराचा मूर्ती असलेला कळस भाविकांचे लक्ष वेधून घेतो. यामुळे मंदिराच्या भव्यत्वाची प्रचिती येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस एका झटक्यात होणार कॅन्सरचे निदान, IIT कानपुरने तयार केले डीव्हाईस
आता कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे जर झटपट निदान झाले तर उपचार लवकर सुरु करता येतात आणि रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य...
मिंधे सरकार हे महिलाविरोधी सरकार, पुणे प्रकरणावरून नाना पटोले यांची टीका
मुंबईचा वंडर बॉय आणि Team India चा कर्णधार रोहित शर्मा इथेही अव्वल, विराटचा कोहलीचा विक्रम मोडला
Israel Palestine Conflict – तीन महिन्यांपूर्वी हमासच्या तीन प्रमुख नेत्यांना संपवलं, इस्त्रायलचा मोठा दावा
Central Railway Update – मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक, कळवा-मुंब्रा वासियांसाठी गुड न्यूज
मेहकर येथे शिवसेनेचा गद्दार व शासनाच्या विरोधात विक्रमी मोर्चा
आधी भाजप उमेदवारासाठी प्रचार, मग तासाभरात काँग्रेस प्रवेश