लांडे यांच्यासह पाच नगरसेवक ‘तुतारी’ च्या वाटेवर? अजित पवार गटाचे माजी नगरसेवकही संपर्कात

लांडे यांच्यासह पाच नगरसेवक ‘तुतारी’ च्या वाटेवर? अजित पवार गटाचे माजी नगरसेवकही संपर्कात

लोकसभेला शिरूरमधून उमेदवारीसाठी डावलल्याने नाराज असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पाच माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. लांडे आणि पाच माजी नगरसेवकांनी पुण्यातील मोदीबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज भेट घेतली आहे. तसेच यावेळी माजी नगरसेवकांनी तर ‘साहेब, चिंचवडमधील उमेदवारीसाठी आमच्यापैकी एकाचा विचार व्हावा; अन्यथा तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याचे आम्ही काम करू,’ अशी ग्वाही देऊन टाकली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पिंपरी- चिंचवड शहरातील बहुतांशी पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले ते. मात्र, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि शरद पवार गटाकडे शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा ओढा वाढला आहे.

विधानसभेसाठी तीव्र इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सुमारे 20माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शहरात अजित पवार गटाची अस्वस्थता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी चार माजी नगरसेवकांनी ‘राष्ट्रवादीला चिंचवडची जागा सोडून घ्या; अन्यथा आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही,’ असा इशारा दिला होता. मात्र, पक्षाने योग्य ती दखल घेतली नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नढे, प्रशांत शितोळे, संतोष कोकणे या पाचजणांनी भेट घेतली आहे.

दरम्यान, अजित गव्हाणे यांचा शरद पवार गटात प्रवेश झाल्यापासूनच माजी आमदार लांडे हेही ‘तुतारी’ हाती घेणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, लांडे हे ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही भेटी घेत आहेत. त्यामुळे लांडे यांच्या भूमिकेबाबत संभ्रम वाढला असतानाच आज पुन्हा ज्येष्ठ नेते पवार यांची भेट घेतली आहे. लांडे कोणता निर्णय घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीत असलो, तरी आता पर्याय शोधला पाहिजे. किती दिवस शांत राहणार आहे? चार दिवसांपूर्वी आम्ही भूमिका स्पष्ट केली होती; परंतु पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पवारसाहेबांची भेट घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती त्यांना सांगितली. आमचा विचार व्हावा. तुम्ही जो उमेदवार द्याल, तो आम्हाला मान्य असेल. आमच्यासह भाजपमधील काही माजी नगरसेवक त्या उमेदवाराचा प्रचार करतील.

– विनोद नढे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार भाजपमध्ये मोठं काहीतरी घडतंय, अमित शाह मुंबईत, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना हुंकार, रात्री खलबतंही होणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते विधानसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच आता केंद्रीय...
मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात या तारखेपासून बदल, पाहा काय घेतला निर्णय
शिवाजी पार्क ठाकरेंचेच, मुंबई की ठाणे? शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं नवं ठिकाण ठरलं?
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर एकटेच गेले, राऊत अन् नड्डांचीही झाली भेट, राज्याच्या राजकारणात या गौप्यस्फोटाने खळबळ
मुंबईतील रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, मुख्यमंत्र्यांकडून डीनच्या बदलीचे आदेश, चौकशी समिती गठीत
“नायर रुग्णालयाची वाटचाल कोलकाताच्या दिशेने…”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसे आक्रमक, म्हणाले “नंतर एन्काऊंटर करण्यापेक्षा…”
अमित शाह मुंबईत आले… भाषणापूर्वी कार्यकर्त्यांना काय भरला दम?; इन्साईड स्टोरी काय?