गिरगावातील स. का. पाटील उद्यान जनतेसाठी खुले करा! शिवसेनेने घेतली सी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांची भेट

गिरगावातील स. का. पाटील उद्यान जनतेसाठी खुले करा! शिवसेनेने घेतली सी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांची भेट

नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले गिरगावातील स.का. पाटील उद्यान जनतेसाठी लवकरात लवकर खुले करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर, शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे, विभागसंघटक युगंधरा साळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक-12तर्फे सी वॉर्ड सहाय्यक आयुक्त विधाते यांना जाब विचारण्यासाठी नुकतीच दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या सी वॉर्ड  कार्यालयाला धडक दिली. स.का. पाटील उद्यान जनतेसाठी खुले करून त्या ठिकाणी असलेली खुली व्यायाम शाळा, त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्याकरता खेळणी, जॉगिंग ट्रक अशा विविध समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. त्याचबरोबर मुंबादेवी मंदिराजवळ असलेले डम्पिंग ग्राउंडच्या साफसफाईला सुरुवात झाली असून ती नवरात्रीच्या अगोदर पूर्ण साफ करावी. तसेच त्या ठिकाणी नवरात्रीमध्ये येणाऱ्या भाविकांकरिता सोय करावी, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.

या वेळी शिवसेनेचे निकास मयेकर, संपत ठाकूर, कृष्णा पोवळे, उदय बने, दिलीप सावंत, शिवाजी राणे, सुनील कदम, शाखाप्रमुख मंगेश सावंत, संतोष घरत, जयवंत नाईक, महिंद्र कांबळे, वैभव मयेकर, प्रभाकर पाष्टे, अजय शेडगे, शशिकांत पवार, बाळा अहिरेकर, प्रकाश मिसाळ, विजय पवार, कुमटेकर, विशाखा पेडणेकर, माधुरी केंढारी, कल्पना सुर्वे, कल्पना भांबुरे, ज्योती मेनकुदळे, सुरेखा उबाळे, मीना आंधळे, वर्षा साबळे, रेणुका तेवरकर, रंजना ऐकवडे, संजीवनी मानकर व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती