दसर्‍याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश

दसर्‍याच धुणे धुण्यासाठी गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू, पत्नीला वाचविण्यात नागरिकांना यश

चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथील बालाजी कोंडीबा वाघमारे आणि त्यांच्या पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे हे दसर्‍याचे धुणे धुण्यासाठी गावच्या तलावात गेले होते. तलावात धुणे धुत असताना अचानक बालाजी यांचा पाय घसरला व ते त्यांच्या पत्नीसह तलावात पडले. तलावात पाणी खोल असल्याने बालाजी यांचा बुडून मृत्यू झाला. तर गयाबाई यांना आजुबाजूच्या लोकांनी वाचवले. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. बालाजी वाघमारे यांच्या प्रेताची तलावात शोध मोहीम युध्द पातळीवर सुरू असताना सायंकाळी मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले आहे.

चाकूर तालुक्यातील भाटसांगवी येथील रहिवाशी बालाजी कोंडीबा वाघमारे (वय 53 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे (वय 45 वर्षे) हे गावातील पाझर तलावावर दसर्‍याचे धुणे धुण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने पती बालाजी कोंडीबा वाघमारे यांचा खोल पाण्यात पाय घसरला आणि ते आणि त्यांची पत्नी गयाबाई दोघे पाण्यात बुडू लागले. सुदैवाने आजुबाजुच्या लोकांनी गयाबाई यांना पाण्यातून काढल्याने त्यांचे प्राण वाचले.

घटनेची माहिती मिळताच चाकूर येथून रुग्णवाहिका आणि अहमदपूर नगर परिषदेची अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचले असून, बालाजी वाघमारे यांचा मृतदेह काढण्यास युध्दपातळीवर काम सुरू होते. उशीरा सायंकाळी बालाजी वाघमारे यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूने भाटसांगवी व चाकूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बालाजी वाघमारे हे शेतमजूर म्हणून रोजंदारीवर काम करीत होते. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असून, कर्ता पुरुष डोळ्यासमोर पाण्यात बुडाल्याने पत्नीने यावेळी टाहो फोडला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हवाई सुंदरीच्या धर्तीवर एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’ हवाई सुंदरीच्या धर्तीवर एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
विमानात जशी हवाई सुंदरी अगदी त्याच धर्तीवर आता एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार आहे. शिवसेना नेते भरत गोगावले...
14 वर्ष बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या गोविंदाचं करिअर कोणत्या गोष्टीमुळे संपलं?
मोठी बातमी ! मनोज जरांगे हेच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; कुणी केली ही घोषणा?
सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Ind Vs Ban Test Series 2024- आमची 100 धावांवर बाद होण्याची तयारी होती…; रोहित शर्मा स्पष्टचं बोलला
फडणवीसांच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो ताटातील चटणीसारखा, अंबादास दानवे यांचा जबरदस्त टोला