पिंपरीत भाजपला पुन्हा धक्का; माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांचा पक्षाला रामराम

पिंपरीत भाजपला पुन्हा धक्का; माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांचा पक्षाला रामराम

पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली गळती थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत चार माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता पाचव्या माजी नगरसेवकाने पक्षात लोकशाही नसून घराणेशाही सुरू असल्याचा आरोप शहराध्यक्षांवर करून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 77 नगरसेवक निवडून आले होते. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही. भाजपचे माजी नगरसेवक वसंत बोराटे, तुषार कामठे, माजी नगरसेविका माया बारणे, प्रियांका बारसे यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनीही राजीनामा दिल्यामुळे भाजपची गळती थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

पिंपळे निलख परिसराचे माजी नगरसेवक कस्पटे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे त्यांनी
राजीनामा पाठविला आहे. कस्पटे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, निष्ठावंत कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यायचे सोडून सापत्न वागणूक देणे, कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून सुरू आहे. हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. चिंचवड विधानसभेत पक्षात कुठेही लोकशाही नाही, फक्त घराणेशाही आहे. माझ्यासारखे अनेक माजी नगरसेवक घराणेशाहीला, यांच्या हुकूमशाहीला कंटाळले आहेत.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांच्यासाठी मी व माझ्यासारख्या अनेक नगरसेवक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपापल्या प्रभागात मताधिक्य दिले. पक्षाने शंकर जगताप यांची भाजप शहराध्यक्षपदी निवड केली. परंतु, पक्षाची कार्यकारिणी करताना त्यांनी ताकतवर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना जाणूनबुजून बाजूला ठेवले. हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या, असे कस्पटे यांनी म्हटले आहे. त्यांनी भाजप सोडल्याने वाकड, रहाटणी, काळेवाडी पट्ट्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

आणखी १५ माजी नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत – संदीप कस्पटे
पक्षाने मला स्वाभिमान शिकवला आहे. कुणाच्या ताटाखालचे मांजर मी होऊ शकत नाही. मी शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीला वैतागून भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तसेच आणखी १५ माजी नगरसेवक पदाधिकारी राजीनाम देण्याच्या तयारीत असल्याचेही कस्पटे यांनी पत्रात म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला कार्यकर्त्यांनी काय-काय करायचं? अमित शाह यांनी मुंबईतल्या मेळाव्यात आखला प्लॅन, भाजपने शड्डू ठोकला
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शड्डू ठोकला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक ही...
‘त्यावेळी’ महाराष्ट्रात फक्त भाजपचंच सरकार येणार, अमित शाह यांचं मोठं विधान
बिग बॉस होस्ट करण्यासाठी या दिग्गज मराठी अभिनेत्याला होती ऑफर, का दिला नकार?
पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…
विदर्भाच्या विकासाची नितीन गडकरींनी केली पोलखोल, मोठे गुंतवणूकदार येत नसल्याची दिली कबूली
लेबनानमधील पेजर स्फोटानंतर आता इराणला iPhone स्फोटाचा धोका!
Bangkok मध्ये मोठी दुर्घटना; टायर फुटल्याने स्कूल बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती