Mumbai News – बोलण्यास नकार दिला म्हणून प्रेयसीवर चाकू हल्ला, मग स्वतःचा गळा कापला

Mumbai News – बोलण्यास नकार दिला म्हणून प्रेयसीवर चाकू हल्ला, मग स्वतःचा गळा कापला

बोलण्यास नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूहल्ला करत प्रियकराने स्वतःचा गळा कापला. मुंबईतील भांडुप परिसरात ही घटना घडली. दोघेही गंभीर जखमी असून महिलेवर मुलुंडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पीडित महिलेच्या पतीचे 2016 मध्ये निधन झाले आहे. महिलेला 15 वर्षांचा मुलगा आहे. महिला मुलगा आणि बहिणीसह भांडुप परिसरात राहत असून घरकाम करते. आरोपी भगने आणि पीडित महिला गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.

काही कारणातून महिलेने भगनेशी बोलणे बंद केले होते. भगनेने महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने नकार देत त्याला निघून जाण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

संतापाच्या भरात भगने याने चाकू काढला आणि महिलेचा गळा चिरला. त्यानंतर भगनेने स्वतःचाही गळा चिरला. रस्त्यावरून चाललेल्या नागरिकांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या गळ्यावर 15 टाके पडले असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. भगनेची प्रकृती चिंताजनक आहे.

भांडुप पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 109 (हत्येचा प्रयत्न), 118(1) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), 118(2) (धोकादायक शस्त्राने गंभीर दुखापत करणे), 352 (शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमान) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(1)(अ) आणि 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मास्टरस्ट्रोक, उमेदावारांसह-पक्षाची डोकेदुखी वाढली, नक्की निर्णय काय? Maharashtra Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मास्टरस्ट्रोक, उमेदावारांसह-पक्षाची डोकेदुखी वाढली, नक्की निर्णय काय?
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाबाबतची चर्चा अखेरच्या टप्प्यात आहे. तर काही जागांवरुन घोडं...
maharashtra assembly election date 2024: महाराष्ट्रात निवडणुका एका टप्प्यात होणार का? निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितले
कल्याण, कुर्ला, कोलाबा या ठिकाणी सर्वात कमी मतदान, निवडणूक आयोगाने काय म्हटलं
Maharashtra Election 2024 : महाराष्ट्राच्या महानिवडणुकीची काय तयारी; कधी होतील तारखा घोषीत, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले नव्हते, आता काय होणार… निवडणूक आयुक्त म्हणाले….
ऐश्वर्या रायने IIFA च्या व्यासपीठावर या व्यक्तीचे धरले पाय, बच्चन कुटुंबातील…
सैफ अली खान याच्याकडून अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, माझ्या…