कांदिवलीत गणपतीपुळे मंदिराचा हुबेहूब देखावा

कांदिवलीत गणपतीपुळे मंदिराचा हुबेहूब देखावा

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारण्यात येतात. यंदा कांदिवली ठाकूर व्हिलेज येथील हाथवे साई स्टार गणेशोत्सव मंडळातर्फे रत्नागिरीमधील गणपतीपुळे मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांच्या रांगा लागत आहेत.

हाथवे साई स्टार गणेशोत्सव मंडळ यंदा रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. शिवसेना नेते आमदार अ‍ॅड. अनिल परब आणि उद्योजक सदानंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन केले जाते. नितीन केणी आणि शंकर नायर या दोन भागीदारांसवेत यावेळी तीन तरुणांनी या गणेशोत्सवाची विशेष जबाबदारी पार पाडली आहे.

अनिकेत कदम, आकाश नायर आणि ओजस केणी हे तरुण या गणेशोत्सवासाठी अग्रभागी असतात. वेगवेगळे देखावे हे या गणेशोत्सवाचे आकर्षण असल्याने भाविकांची दरवर्षी येथे प्रचंड गर्दी उसळते. नीट परीक्षांचा घोटाळा, कोकणातील रस्ते आणि कश्मीरातील चकमकी हे तीन विषय घेऊन यावेळी देखावा उभारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दागिने हिसकावून चोरांचे मुंबई-सोलापूर-पुणे, घाटकोपर पोलिसांनी शिताफीने पकडले दागिने हिसकावून चोरांचे मुंबई-सोलापूर-पुणे, घाटकोपर पोलिसांनी शिताफीने पकडले
घाटकोपर येथे रिक्षाने प्रवास करणाऱ्या दोघा महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून दोघे चोर सटकले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी थेट सोलापूर गाठले....
महाविकास आघाडीचे पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन; वाडिया महाविद्यालय संस्थाचालक, ट्रस्टीविरुद्ध गुन्हा दाखल करा
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराचा दावा विवाहिता करू शकत नाही, हायकोर्टाने आरोपीला मंजूर केला अटकपूर्व जामीन
भाजपच्या संजय पाटलांची राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षाला घरात घुसून मारहाण
मॉलमधून चोरायचे महागडे कपडे
नाटेकर स्मृती बॅडमिंटन उद्यापासून
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचे आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री बनवतात, केजरीवाल यांचा अजित पवारांवरून मोदींवर घणाघात