जल्लोष, आवाज युवा सेनेचाच! सिनेट निवडणुकीत दहाही जागांवर दणदणीत विजय

जल्लोष, आवाज युवा सेनेचाच! सिनेट निवडणुकीत दहाही जागांवर दणदणीत विजय

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा युवा सेनेने दहापैकी दहा जागा जिंकल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरलेल्या युवासेनेच्या 10 शिलेदारांनी सिनेटवर दणदणीत विजय मिळविला. या विजयाने पदवीधर मतदारसंघात भगव्याचीच शान आणि वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले. हा विजय विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील विजयाची नांदी मानली जात आहे.

युवा सेनेच्या शिलेदारांनी भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा धुव्वा उडविला. सिनेटच्या मागील निवडणुकीतही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वाची जादू चालली होती आणि युवा सेनेने दहाही जागांवर विजय पटकावला होता.

आदित्य ठाकरे यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करीत निकालावर प्रतिक्रीया दिली. सरकारने सिनेट निवडणुकीत अडथळे निर्माण केले. ते निवडणुका हरतील. म्हणूनच कदाचित ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही घेत नाहीत. सिनेट निवडणुकीत जे विजयी झाले, त्यांचे अभिनंदन. मतदारराजाने आम्हाला साथ दिली. निवडणुका थांबवण्यासाठी मिंधेकडून सातत्याने प्रयत्न झाले. मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. हा निकाल सुरुवात आहे. असाच विजय महाविकास आघाडी प्राप्त करेल, असे सांगून आदित्य ठाकरे यांनी विरोधकांनाही टोला लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला...
गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला, नागपुरात हजारो उतरले रस्त्यावर
एआयची कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला संभाव्य ग्राहक कळणार
दिल्लीत प्रदूषणामुळे आणीबाणीसारखी स्थिती; काय कारवाई केली? सर्वोच्च न्यायालयाने कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटला फटकारले
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर खासगी क्लास चालक वठणीवर! ग्राहकाला आगाऊ फीचे पैसे केले परत
इस्रायलने केलेहिजबुल्लाहचे मुख्यालय जमीनदोस्त; बैरूतमध्ये स्फोटांचा प्रचंड धूमधडाका, हिजबुल्लाह प्रमुख नसरल्ला होता लक्ष्य
लडाखमधून चीन सैन्य मागे घेणार