विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणूक पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 24 सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी नाना पटोले यांनी केली.

यासंदर्भात टिळक भवनमध्ये नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजप युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या भाजप युती सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक निःपक्षपातीपणे होणार नाही, अशी मागणी काँग्रेसने केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयात गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली व गृहमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची तोडफोडही केली. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश...
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती
आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…
Video – राज्याचे गृहमंत्री असुरक्षित! सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली